देशात कोरोना बाधितांची संख्या गेली 38 हजारांच्या जवळ, 1223 जणांचा मृत्यू

देशात कोरोना बाधितांची संख्या गेली 38 हजारांच्या जवळ, 1223 जणांचा मृत्यू

देशात कोरोना व्हायरसचं ‘म्युटेशन’ झालं आहे का याचा अभ्यास ICMRचे संशोधक करत आहेत. व्हायरसचं औषध शोधण्यासाठी अशा प्रकारच्या अभ्यासाची गरज असते.

  • Share this:

नवी दिल्ली 02 मे : देशात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. जगातल्या इतर देशांपेक्षा भारतात कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात असला तरी संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोबाधितांची संख्या आता 37776 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 1223वर गेला आहे. जगात आत्तापर्यंत 32 लाख लोक बाधित असून 2 लाख 28 हजार जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोना व्हायरसचं ‘म्युटेशन’ झालं आहे का याचा अभ्यास ICMRचे संशोधक करत आहेत.

व्हायरसचं औषध शोधण्यासाठी अशा प्रकारच्या अभ्यासाची गरज असते. ‘म्युटेशन’ म्हणजे कोव्हिड व्हायरमध्ये अनुवांशिक बदल झाला आहे का याचा शोध घेणं. हा व्हायरस अधिक आक्रमक किंवा धोकादायक झाला आहे का? याचा अंदाजही यातून येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी गृहमंत्री अमित शाह (Home Minster of India Amit Shah) आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्यासह काही महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये लॉकडाऊनमुळे प्रभावित क्षेत्रांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याबाबत चर्चा  झाली. या बैठकीमध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालयातील काही अधिकारी देखील सहभागी झाले होते.

काय असणार दुसऱ्या आर्थिक पॅकेजमध्ये?

Reuters या वृत्तसंस्थेच्या मते सरकार कोरोना व्हायरसमुळे प्रभावित क्षेत्रांना मदत करण्याठी जास्तीत जास्त 4.5 लाख (60 अब्ज डॉलर) कोटींपर्यंत खर्च करू शकते

हे वाचा-VIDEO अडकलेल्या परप्रांतिय मजुरांचा उद्रेक, पोलिसांवर केली तुफान दगडफेक

यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. अर्थ मंत्रालयच्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, आम्ही आधीच जीडीपीच्या 0.8 टक्के पॅकेज दिलं आहे. जीडीपीच्या 1.5%-2% इतकं आणखी पॅकेज देण्याची क्षमता असल्याचंही ते म्हणाले.

हे वाचा- बापरे! सिमेंट मिक्स करणाऱ्या अजस्त्र टाकीत बसले 18 मजूर, VIDEO पाहून बसेल धक्का

Reuters ने दिलेल्या माहितीनुसार या पॅकेजमध्ये देशातील गरिबांप्रमाणेच त्यांचा विचार केला जाईल ज्यांची नोकरी गेली आहे किंवा जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे करामध्ये सूट देऊन छोट्या-मोठ्या कंपन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याची अट घालून यासंदर्भात माहिती दिली आहे.

 

 

First published: May 2, 2020, 8:08 PM IST

ताज्या बातम्या