कोरोनाचा फास आवळतोय, देशात रुग्णांच्या संख्येने पार केला 2 हजारांचा आकडा

कोरोनाचा फास आवळतोय, देशात रुग्णांच्या संख्येने पार केला 2 हजारांचा आकडा

मुंबईमध्ये अवघ्या 8 तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 62वर गेली आहे तर आज दिवसभरात महाराष्ट्रात 81 नवे रुग्ण सापडले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 02 एप्रिल : देशात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत आहे. मरकज जमात प्रकरणानंतर रूग्णांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांची संख्या 2069 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 53 जणांचा मृत्यू झालाय. पुढच्या काही दिवसांमध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशात कोरोनाबाधित 55 विदेशी नागरीक असल्याची माहिती आज आरोग्य मंत्रालयाने दिली.

कोरोना संदर्भात मुंबईकरांची चिंता वाढवणारे आकडे समोर आले आहेत. मुंबईमध्ये अवघ्या 8 तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 62वर गेली आहे तर आज दिवसभरात  महाराष्ट्रात 81 नवे रुग्ण सापडले आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आता 416वर पोहोचली आहे. तर मुंबईमध्ये कोरोनामुळे 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या या वाढत्या आकड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून नियमांचं पालन करा आणि घरात सुरक्षित राहा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात 6, पिंपरी चिंचवडमध्ये 3, मुंबईमध्ये  57,  ठाण्यात 5, नगरमध्ये 9 आणि बुलढाण्यात 1 अशा 81 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या रुग्णांना कोरोनाची लागण कशी झाली याबद्दल अद्याप माहिती येणं बाकी आहे. मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. डोंबिवली आणि कल्याण परिसरात आज 5 नवे रुग्ण आढळून आले आहे.

मृत्यू समोर दिसत असतानाही 90 वर्षांच्या आजीने व्हेंटिलेटर दिलं तरूण रूग्णाला

दिल्लीतल्या तबलिग जमातच्या कार्यक्रमामुळे सगळ्यात देशात कोरोनाचा प्रसार वेगात झालाय. रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इंडोनेशिया, मलेशिया, सोदी अरेबिया, बांगलादेशसह अनेक देशांमधून मौलाना प्रचारासाठी आले होते. यातल्या 960 जणांवर केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे. त्या सगळ्यांना केंद्र सरकारने काळ्या यादीत टाकलं असून त्यांचा व्हिसाही रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे.

भयंकर... अमेरिकेत शवपेट्याही पडताहेत अपुऱ्या, दिली लाखभर ‘बॉडी बॅग’ची ऑर्डर

या कार्यक्रमासाठी 1306 विदेशी मौलाना भारतात आले होते. सगळ्यांना पर्यटक व्हिसा मिळाला होता. या व्हिसावर आलेल्यांना धर्म प्रचार आणि प्रसारासाठी कुठलंही काम करता येत नाही. त्यामुळे त्यांनी व्हिसाच्या नियमाचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं होतं त्यामुळे गृहमंत्रालयाने ही कारवाई केली आहे.

बापरे! ‘तबलिगी जमात’मुळे तब्बल 400 जणांना कोरोना, देशभर पडला विळखा

दिल्लीतल्या ‘तबलिगी जमात’मुळे देशभर कोरोना पसरला हे आता सिद्ध झालं. या कार्यक्रमात जे सहभागी झाले होते आणि त्यांच्या जे लोक संपर्कात आले होते अशा तब्बल 400 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. सर्वाधिक वेगाने हा व्हायरस पसरण्याचं हे देशातलं पहिलच उदाहरण आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या आणि जमातचे कार्यकर्ते अशा 9 हजार जणांची ओळख पटविण्यात गृहमंत्रालयाला यश आलं आहे. यात 1306 जण विदेशी नागरीक असून त्या सगळ्यांना क्लारंटाइन करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या वतीने आज देण्यात आली.

 

 

First published: April 2, 2020, 8:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading