#BREAKING: देशात कोरोना रुग्णांची संख्या 519वर, महाराष्ट्र 107 तर केरळ 87 रुग्ण

#BREAKING: देशात कोरोना रुग्णांची संख्या 519वर, महाराष्ट्र 107 तर केरळ 87 रुग्ण

राज्यात काल रात्रीपासून कोरोनाच्या 18 नविन रुग्णांची नोंद झाली. तर एका कुटुंब कोरोनातून बरं झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 24 मार्च : देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातल्या रुग्णांचा आकडा आज 519वर पोहोचला अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक 107 तर केरळमध्ये 87 जणांचा समावेश आहे. सख्या वाढत असल्याने जवळपास सरर्वच राज्यांनी लॉकडाउन केलं असून अनेक राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अशातच मुंबईत आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेला 65 वर्षीय व्यक्ती नुकताच युएई येथून मुंबईत आला होता. या व्यक्तीला ताप, खोकला आणि श्वसनासाठी त्रास होत असल्याने 23 मार्च रोजी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

राज्यात १८ नवीन करोना बाधित रुग्ण

राज्यात काल रात्रीपासून कोरोनाच्या 18 नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०७ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे 6, सांगली मधील इस्लामपूरचे 4, पुण्याचे 3, सातारा जिल्ह्यातील 2 तर अहमदनगर, कल्याण - डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. या नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे 8 रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आहेत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Coronavirus च्या संकटामुळे अर्थमंत्र्यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा; करदात्यांना दिलासा

निर्मला सीतारामन यांनी Coronavirus च्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. करदात्यांना त्यातून मोठा दिलासा देण्यात आला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अर्थमंत्र्यांनी वाढवली आहे. या महासाथीच्या संकटामुळे जगभरावर आर्थिक संकट ओढवलं आहे. भारतातही अनेक उद्योगांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.

या आहेत महत्त्वपूर्ण घोषणा

- इन्कम टॅक्स भरण्याची मुदत वाढवली

- उशीरा टॅक्स रिटर्न फाइल करणाऱ्यांना दंड कमी

- टॅक्स भरण्याची मुदत 30 मार्चवरून 30 जूनपर्यंत

- GST साठी मुदत वाढवली. आता 30 जूनपर्यंत भरता येणार हा कर.

- पुढचे तीन महिने ATM मधून कॅश काढायला कुठलीही फी नाही

- आर्थिक मदतीसाठी पॅकेज लवकरच जाहीर करणा

- कंपन्यांसाठी इतर आर्थिक मदतही जाहीर करणार.

- अनेक लोक घरून काम करत आहेत. त्यामुळे कोरोनाचं संकट टळेपर्यंत कायद्यानुसार कुठलीही लेट फी, दंड आणि व्याज आकारण्यात येणार नाही.

अन्य बातम्या

जग 2008-09 पेक्षाही भयावह मंदीच्या खायीत लोटलं जाणार, IMFच्या संचालकांचा इशारा

कोरोनामुळे 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार, बेरोजगारी वाढण्याची दाट शक्यता

First published: March 24, 2020, 6:45 PM IST

ताज्या बातम्या