S M L

वेबसाईटवर तब्बल 20 लाख लोकांनी पाहिलाय स्टीफन हॉकिंग यांचा प्रबंध

1966 मध्ये त्यांनी "Properties of expanding universes" या विषयावर डॉक्टरेट मिळवली तेव्हा त्यांचं वय फक्त 24 वर्षांचं होतं.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 14, 2018 09:27 PM IST

वेबसाईटवर तब्बल 20 लाख लोकांनी पाहिलाय स्टीफन हॉकिंग यांचा प्रबंध

14 मार्च : कृष्णविवरांच्या संदर्भात मोलाचं योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. विख्यात शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत.

अभ्यासकांच्या मागणीनंतर काही वर्षींपूर्वी जेव्हा केंब्रिज विद्यापीठानं त्यांच्या पीएचडीचा प्रबंध जेव्हा वेबसाईटवर टाकला तेव्हा अभ्यासकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हा प्रबंध पाहण्यासाठी उड्या पडल्या काही तासातच 60 हजार लोकांनी प्रबंध पाहण्याचा प्रयत्न केल्याने विद्यापीठाची वेबसाईटच क्रॅश झाली होती.

आत्तापर्यंत तब्बल 20 लाख लोकांनी हा प्रबंध पाहिलाय. 1966 मध्ये त्यांनी "Properties of expanding universes" या विषयावर डॉक्टरेट मिळवली तेव्हा त्यांचं वय फक्त 24 वर्षांचं होतं. पण त्यांच्या अशा अकाली जाण्यानं विज्ञानसुर्य मावळला अशी भावना सगळ्यांकडून व्यक्त होतं आहे. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 09:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close