कोलकाता, 24 जून : तरुणी मद्यधुंद आणि अर्धनग्न अवस्थेत भररस्त्यात तमाशा करत असल्याची धक्कादायक घटना कोलकाता इथे समोर आली. कोलकाता पोलिसांनी या महिलेला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र महिलेनं हुज्जत घालण्यास सुरुवात केली. अर्धनग्न अवस्थेत असल्यानं तिच्या जवळ जाण्यास कोणी तयार नव्हतं. पोलिसांसोबत महिला पोलीस नसल्यामुळे पोलिसांनी समजवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
जवळपास तासभर पश्चिम बंगालमधील रेड रोडवर हा धिंगाणा सुरू होता. त्यानंतर महिला पोलिसांच्या मदतीनं या तरुणीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री एका तरुणासोबत कोलकाता मैदानात दारू पिण्यासाठी बसली होती. तिने आपलं साहित्य तिथेच सोडलं आणि टॉपलेस अवस्थेत रेड रोडवरून चालत जात होती. तरुणीची अवस्था पाहून स्थानिकांनी पोलिसांना तिच्यासंदर्भात माहिती दिली.
हे वाचा-
अर्धनग्न होत रेहाना फातिमाने स्वत:च्या मुलांना करू दिलं बॉडी पेंटिंग,गुन्हा दाखल
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणीचा टॉपलेस होऊन धिंगाणा चालू झाला. पोलिसांनी महिला पोलिसांनी बोलवून या तरुणीला ताब्यात घेतलं आहे. ही तरुणी पद्मपुकूर इथली रहिवासी आहे. या तरुणीच्या वडिलांचा 2010मध्ये मृत्यू झाला आहे. ही तरुणी आपल्या आई आणि भावासोबत राहाते.
संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.