Home /News /national /

Jammu-Kashmir: सुरक्षा दलाला मोठं यश, लष्कर ए तोयबाच्या 2 टॉप कमांडरचा खात्मा

Jammu-Kashmir: सुरक्षा दलाला मोठं यश, लष्कर ए तोयबाच्या 2 टॉप कमांडरचा खात्मा

सैफुल्ला दनयाली आणि इर्शाद अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. सैफुल्ला हा पाकिस्तानचा नागरीक असून इर्शाद हा पुलवामा इथे राहणारा होता.

    श्रीनगर 12 ऑक्टोबर: जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) ची राजधानी असलेलं श्रीनगर (Srinagar) आज दोन चकमकींनी हादरून गेलं. शहरातल्या रामबाग भागात सुरक्षादलांसोबत (Indian security force) झालेल्या चकमकीत (Encounter) दोन दहशतवादी (Terrorist) ठार झाले. हे दोघेही लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे टॉप कमांडर होते. त्यामुळे सुरक्षा दलांचं हे मोठं यश मानलं जात आहे. सैफुल्ला दनयाली आणि इर्शाद अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. सैफुल्ला हा पाकिस्तानचा नागरीक असून इर्शाद हा पुलवामा इथे राहणारा होता. रामबाग भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने या भागात सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्याच दरम्यान संशय असलेल्या घरामधून गोळीबार सुरू झाला. सुरक्षा दलांनी या घराला घेराव घालून त्याला प्रत्युत्तर दिलं. दहशतवादी आणि सुरक्षा दलांची ही चकमक काही तास सुरू होती. त्यात हे दोन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांचा गोळीबार एवढा प्रचंड होता की यात दोन पेक्षा जास्त दहशतवादी असल्याचा संशय आहे. त्यामुळे या भागातलं सर्च आपरेशन पुन्हा एकदा सुरू केलं आहे. महाराष्ट्राच्या दिशेनं येतय वादळ? बंगालच्या उपसागरात तयार होतोय कमी दाबाचा पट्टा शनिवारीही राज्यात दोन चकमकींमध्ये 4 दहशतवादी ठार झाले होते.पुलवामा जवळच्या डडूरा गांवात दोन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सर्च ऑपरेशन राबवून त्यांना ठार केलं. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून त्यात अत्याधूनिक रायफल्सचाही समावेश होता. 10 तासांमधली ही दुसरी चकमक होती. त्या आधी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.  एका घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी त्या घराला वेढा दिला आणि दहशतवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यात दोनही दहशतवादी ठार झाले. दरम्यान, दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून आलेल्या शस्त्रांचा साठही सुरक्षा दलांनी जप्त केला होता. त्यात 4 अत्याधुनिक AK-47 रायफल्स आणि प्रचंड मोठा काडतुसांचा साठा होता. लडाखच्या चिमुकल्याचा सैनिकांना कडक सॅल्युट! हा VIDEO पाहून तुम्हालाही येईल जोश गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये ड्रोन्सच्या साह्याने पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर शस्त्रे पाठवत आहे. असे अनेक ड्रोन्स आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आता हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. बर्फवृष्टीमुळे छुपे मार्ग बंद होणार असून त्या आधी दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याची योजना पाकिस्तान आखत आहे. मात्र पाकिस्तानचे सर्व डाव सुरक्षा दलांनी उधळून लावले आहेत. दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाई करून अनेक मोऱ्हक्यांना टिपण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. सुरक्षा दलांनी पोलिसांच्या मदतीने मोठं अभियान हाती घेतलं असून तरुणांमध्येही जनजागृती करण्यात येत आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Jammu and kashmir

    पुढील बातम्या