रामदेवबाबा करणार 'या' नेत्याचा प्रचार, यासह दिवसभरातील 40 महत्त्वाच्या बातम्या

रामदेवबाबा करणार 'या' नेत्याचा प्रचार, यासह दिवसभरातील 40 महत्त्वाच्या बातम्या

हवामानाच्या अंदाजापासून ते राजकारण, क्रीडा, मनोरंजनासह महत्त्वाच्या बातम्या झटपट आढावा.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर: हवामानाच्या अंदाजापासून ते राजकारण, क्रीडा, मनोरंजनासह महत्त्वाच्या बातम्या झटपट आढावा.

1. राज्यात आज प्रचारसभांचा धडाकाच पहायला मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 4 सभा असून योगी आदित्यनाथ यांची मुंबई आणि परभणी येथे सभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात प्रचारसभा होत आहेत. तर उध्दव ठाकरेंची औरंगाबादमध्ये आणि राज ठाकरे यांची मुंबईत सभा होत आहे.

2. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील राज्यात प्रचार करताना दिसतील. प्रमोद सावंत आज पुण्यात एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

3. निवडणुकीच्या प्रचारामध्ये रामदेव बाबासुद्धा मागे राहिले नाहीत. रामदेव बाबा 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रचार करणार आहेत. शिवसेनेच्या सचिन देशमुख यांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये खुद्द रामदेव बाबा दाखल होणार आहेत.

4.पंतप्रधान मोदी हे राज्यात एकूण 9 सभा घेणार आहेत. तर, 18 तारखेला मोदी हे मुंबईत BKC मध्ये प्रचारसभा घेणार आहेत. मोदींच्या राज्यातल्या सभांचं अंतिम वेळापत्रक समोर आलं आहे. 13 ते 17 ऑक्टोबरमध्ये मोदी राज्याच्या विविध जिल्ह्यात सभा घेणार आहेत.

5. मोदीं पाठोपाठ आता राहुल गांधीदेखील महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत. येत्या 13 तारखेला राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असून 13 आणि 15 ऑक्टोबरला राहुल गांधींच्या महाराष्ट्रात 2 सभा होणार आहेत.

6. भाजप आणि शिवसेनेसाठी यंदाची विधानसभा निवडणूक सोपी असल्याचं मानलं जात असतानाच युतीला धक्का बसला आहे. कारण जवळपास 50 मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी भाजप-सेना युतीची डोकेदुखी वाढवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, कोकणातील कुडाळ, सावंतवाडी, गुहागर यासह विदर्भ आणि मराठवाड्यातीलही अनेक जागांवर युतीतील नाराज नेत्यांनी बंडाचं अस्त्र उगारलं आहे.

अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. कारण नगरमधील राष्ट्रवादीतील महत्त्वाचं नाव आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कळमकर यांनी हाती शिवबंधन बांधलं.

शूटिंग दरम्यान रेखा यांना 5 मिनिटं KISS करत होता अभिनेता, झाली अशी अवस्था

7. 'लोकांना आता राज्यात परिवर्तन हवं आहे', असं म्हणत पवारांनी अकोल्याच्या सभेत सरकारवर टीकास्त्र सोडलं. आज शरद पवार हे नागपूर जिल्ह्यात प्रचारसभा करणार आहेत. बुट्टीबोरी आणि हिंगणा इथं पवारांच्या प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या सत्रास सुरुवात झाल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.

8. 'खाऊन-खाऊन तुम्ही थकला आहात, आता किती खाणार?', असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी बुधवारी संगमनेरच्या सभेत विरोधकांवर तोफ डागली. सत्ता गेल्यानं विरोधक बेकार झाले असून राज्यभर ठोठो करत फिरत असल्याची टीकाही संगमनेरच्या सभेत केली.

9. संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली. या सभेत व्यासपीठावर उद्धव ठाकरेंचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे व्यासपीठावर दिसले. अगदी पहिल्या रांगेत बसल्यानं आता आदित्यनंतर तेजस ठाकरेंचीही राजकारणात प्रवेश होणार का?, याची चर्चा सुरू झाली. त्यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं.

10. सोलापूर उत्तरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारानं यंदा आपणच आमदार होणार असल्याचं भाकीत केलं आहे. सोलापूर उत्तरेचे राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांनी हा दावा केल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे. धक्कादायक म्हणजे नाशकातील दिंडोरीतल्या बाबानं विजयी होणार असल्याचा आशीर्वाद दिल्याचा दावाही त्यांनी केला.

11. सोलापूरात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर ते ठाम आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र यावी हे माझं वैयक्तिक मत' असल्याचं त्यांनी म्हटलं. भाजप, मोदींना टक्कर देण्यासाठी आम्ही अजून जवान असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी न्यूज18 लोकमतशी बोलतंना दिलं आहे.

12. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची स्थिती मला अधिक चांगली माहिती आहे. एवढंच मी सांगू शकेन', असं म्हणत पवारांनी शिंदेंना खडेबोल सुनावले आहेत.

13. अजित पवारांनी देखील सुशीलकुमार शिंदे यांचे वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं आहे. आम्ही एकत्रित आघाडीत असलो, तरी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी विलीनीकरण विषयी शरद पवारचं अधिक ठरवतील. तुर्तास आम्ही वेगळे पक्ष म्हणूनच भूमिका मांडतो. असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं.

14. सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आघाडीला टोला लगावला. विलीनीकरण झालं तर विरोधक किमान विरोध तरी करू शकतील असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी शिंदेंच्या विधानावर लगावला.

वयाच्या 65व्या वर्षी रेखा यांचं सौंदर्य कायम, काय आहे त्यांचं ब्युटी सिक्रेट

15. पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या तोंडावर संभ्रमावस्था निर्माण करत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. याआधी यासंदर्भातील स्पष्टीकरण पवार साहेबांनी दिलं असून ही राजकीय खेळी आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

16 राष्ट्रवादीतून भाजपत डेरेदाखल झालेले उदयनराजे भोसलेंनी विरोधकांचा समाचार घेतला. राजीनामा द्यायला जिगर लागतं, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश केल्यानं साताऱ्यात पोटनिवडणूक होत आहे.

17. लोकसभा निवडणुकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना आपल्याकडे खेचत भाजपने विरोधकांना धक्का देण्यास सुरुवात केली. त्यानंतर थेट विधानसभा निवडणुकीपर्यंत हे धक्कातंत्र सुरूच राहिले. आता पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

18. मालेगावच्या मेहणे गावात वेळोवेळी पाठपुरावा करूनही पाणी टंचाईचा प्रश्न न सुटल्यानं अखेर ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. निवडणुकीवर बहिष्कार टाकत असून कोणत्याही राजकीय नेत्यांनी गावात प्रवेश करू नये असा फलक लावून इशारा दिला.

19. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. अशातच आयकर विभागाने वंचित बहुजन आघाडीचे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अबुल हसन खान यांच्या कार्यालयावर छापा टाकला आहे.

20. वंचितचे उमेदवार अबुल हसन खान यांच्या साकीनाका कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला. या छाप्यात आयकर विभागाला 1 हजार 100 रुपये आढळून आले.

21. राष्ट्रपतींच्या हस्ते नाशिकच्या आर्मी प्रशिक्षण केंद्राला ध्वज प्रदान. रुद्रनाथ संग्रहालयाचंही उद्घाटन.

22. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोकणात आज जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, पुणे 5 जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 2 दिवसांत साधारण 60 ते 120 मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

23. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस. अग्रणी नदीला पुन्हा पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

24. भिवंडीत दुचाकी खड्ड्यात पडून तरूणीचा मृत्यू. स्वत:च्या लग्नाची खरेदी करून ठाण्याहून भिवंडीला जात असताना नेहा शेखचा खड्ड्यात दुचाकी आदळून अपघात झाला आहे. 8 नोव्हेंबरला नेहाचं लग्न होतं. नेहाच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

25. सोलापूर औरंगाबाद हायवेवर येडशीजवळ पोलिसांनी उभ्या केलेल्या चेक पोस्टमध्ये कंटेनर घुसला. कंटेनरच्या धडकेमध्ये दोन पोलिसांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे.

26. दुर्गाविसर्जनाला महाराष्ट्रात गालबोट. टिटवाळ्यात चार तर नांदेडमध्ये दोन जण बुडाले.

27. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावळज वज्रचौंडे, गव्हाण आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव हद्दीत अग्रणी नदी तुडूंब भरुन वाहू लागली आहे.

Bala Official Trailer : आयुष्मानचा आणखी एक धमाका, पोट धरुन हसवणारी कॉमेडी

28. जळगावमध्ये रावेर इथ चोरवड चेक नाक्यावर 29 लाख 15 हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याच अनुषंगाने फिरत्या वाहन तपासणी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.

29. ठाणे रेल्वे स्टेशनवर एका महिलेनं मुलाला जन्म दिला. सकाळी साडे सहा वाजता ठाणे स्टेशनवर ही प्रसूती झाली. शुभंती पात्रा या कर्जतहून परेलला लोकलने जात होत्या. पण प्रसुती कळा येऊ लागल्यानं त्या ठाणे स्टेशनवर उतरल्या. त्याचवेळी स्टेशनवरील डॉ. सलमान यांनी शुभंती यांची प्रसुती केली.

30. अवेळी पावसामुळे टोमॅटोचे भाव 80 रुपयांवर पोहोचलेत. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत टोमोटोच्या भावात 40 टक्क्यांनी वाढ झाली. एपीएमसी बाजार पेठेत फक्त 15 टोमॅटोच्या गाड्याची आवक झाल्याने 35 ते 40 रुपयाने घाऊक बाजारात टोमॅटो विकला जात आहे.

31. केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी करण्यासोबत कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झालेत. शासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे.

भाजप-शिवसेनेच्या 50 जागा धोक्यात, विधानसभेचं गणित बदलणार?

32. पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांना जामीन मंजूर होऊ नये यासाठी खातेधारकांनी आंदोलन केलं आहे. दोन आरोपींना तुरुंगातच ठेवण्याची मागणी खातेधारकांनी केली. मुंबईतल्या किल्ला कोर्टाबाहेर खातेधारकांनी हातात फलक घेऊन आरोपींच्या जामीनाला विरोध केला.

33. गेल्या काही महिन्यांपासून तोट्यात असणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL)या दोन्ही कंपन्या बंद करण्याचा सल्ला केंद्रीय वित्त मंत्रालयानं दिला आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने (DOT)दोन्ही कंपन्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी जवळपास 74 हजार कोटींचा प्रस्ताव दिला होता. मात्र हा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी धुडकावून लावला. अर्थमंत्र्यांनी दोन्ही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनी बंद करण्याचा सल्लाही दिला आहे.

34. तुमचं बँकेचं खातं (Bank Account)आयडीबीआय बँकमध्ये (IDBI Bank)आहे का ? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 1 जानेवारी 2020 पर्यंत IDBI Bank खात्यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण कार्य तुम्ही पूर्ण केले नाही तर तुमचं खातं ठराविक काळासाठी गोठवलं (Partial Freeze)जाईल. यादरम्यान, तुम्हाला खात्यातून कोणत्याही प्रकारे पैशांचा व्यवहार तुम्ही करता येणार नाही.

35. रिलायन्स जिओने Jio आजपासून फ्री आउटगोइंग कॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Relaince JIO जिओ नेटवर्कवरून दुसऱ्या कुठल्याही इतर मोबाईल नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या फोनला आता 6 पैसे प्रतिमिनिट एवढं शुल्क लागणार आहे. 10 ऑक्टोबरपासून जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल्ससाठी IUC रिचार्ज व्हाउचर्स घ्यावी लागणार आहेत.

36. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पुण्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान 50वा कसोटी सामना खेळणाऱ्या विराटनं संघात एक मोठा बदल केला. हनुमा विहारीच्या जागी जलद गोलंदाजी उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले. दुसरीकडे पहिल्या सामन्यात लाजीरवाणा पराभव मिळालेल्या आफ्रिकेनंही संघात बदल केले आहेत.

37. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पुणे येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टॉसआधी विराटनं आपल्यावर दबाव असल्याचे सांगत सर्वांना बुचकळ्यात पाडले. कॅप्टन कोहलीला टीम मॅन या नावानं ओळखले जाते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं सर्वात जास्त कसोटी सामने जिंकले आहेत.

38. जम्मू-काश्मीर(Jammu-Kashmir)मधील पुंछ(Poonch) सेक्टरमध्ये पाकिस्तान(Pakistan)कडून सातत्याने गोळीबार केला जाता आहे. पाककडून होणाऱ्या या शस्त्रसंधी (ceasefire) उल्लंघनाला भारतीय लष्करा(Indian Army)ने जोरदार उत्तर दिले आहे.भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 3 चौक्या नष्ट झाल्या. तसेच या कारवाईत पाकिस्तानचा एक जवान ठार जाला तर अन्य 7 जण जखमी झाले. पाकिस्तानकडून गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला जात आहे.

39.देशात आर्थिक विकासाची गती मंदावलेली असल्याने वाहन निर्मितीसह अनेक उद्योगांना मोठा फटका बसला आहे. ई-कॉमर्स (E commerce Companies) कंपन्यांनी मात्र सणांच्या दिवसांमध्ये बक्कळ कमाई केल्याचं एका पाहणी अहवालात आढळून आलं आहे. Amazon आणि Flipkartसह काही दिग्गज कंपन्यांनी दसरा आणि नवरात्रीच्या सहा दिवसांमध्ये तब्बल 300 कोटी डॉलर्स म्हणजेच 21 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचं आढळून आलं.

40.IMD च्या जागतिक स्पर्धात्मक क्रमवारीत भारताची 9 स्थानांनी घसरण झाली आहे. यामुळे भारत आता 58 व्या स्थानावरून 68 व्या स्थानी पोहचला आहे. इतर देशांच्या अर्थव्यस्थेतही बदल झाला आहे. यामध्ये अमेरिकेला त्यांचं पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. त्यांच्या जागी सिंगापूरने बाजी मारली आहे.

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

Published by: Kranti Kanetkar
First published: October 10, 2019, 2:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading