माओवाद्यांच्या सर्वोच्च नेतृत्वात बदल, मोस्ट वॉन्टेड बसवराजू नवा प्रमुख

माओवाद्यांच्या सर्वोच्च नेतृत्वात बदल, मोस्ट वॉन्टेड बसवराजू नवा प्रमुख

बसवराजूला बढती मिळाल्यामुळं माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता सुरक्षा दलांनी वर्तवली आहे. त्याच्यावर दीड कोटींपेक्षा जास्त रकमेचे बक्षिस आहे.

  • Share this:

महेश तिवारी, गडचिरोली, 28 नोव्हेंबर : जगात हिंसक कारवायात आघाडीवर असलेल्या माओवाद्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) केंद्रीय नेतृत्वात बदल करण्यात आलाय आहे. गेल्या तेरा वर्षांपासून पक्षाच्या प्रमुखपदी असलेल्या मुपाल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती याने पदत्याग केलाय. तर संघटनेचा नवा प्रमुख म्हणून नंबाला केशव राव उर्फ बसवराजुची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे गणपतीने पदत्याग केल्याचं सांगितलं जातं.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे संघटनेचा महासचिव गण्पती यांनी स्वत:हून पदत्याग करण्याची इच्छा व्यक्त केली होती. गणपती हा 71 वर्षांचा आहे. गणपतीला पदमुक्त करण्याचा निर्णय संघटनेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. नंबाला केशव उर्फ बसवराजू हा गेल्या 35 वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रिय असून बॉम्ब आणि स्फोटकतज्ज्ञ म्हणून त्याला ओळखले जातो.

माओवाद्यांच्या केंद्रीय मिलिटरी कमिटीचा प्रमुख म्हणून बसवराजूकडे अनेक वर्षे जबाबदारी होती. अनेक हिंसक माओवादी कारवायांची योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीमागे बसवराजूची मुख्य भुमिका होती.

‘पीपल्स लिबरेशन गुरील्ला आर्मी’च्या नावाखाली वसवराजू कारवायांचे संचालन करीत असे.

बसवराजूला बढती मिळाल्यामुळं माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता सुरक्षा दलांनी वर्तवली आहे. ‘गणपतीवर दोन कोटीपेक्षा जास्तीचे तर बसवराजुवर दीड कोटीपेक्षा जास्त रकमेचं बक्षीस आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) हा जगात मोजक्या हिंसक संघटनांमध्ये वरच्या क्रमांकावर आहे.

VIDEO : मराठा ठोक मोर्चा विरुद्ध क्रांती मोर्चा, 2 नेते आपसात LIVE भिडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 10:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading