काश्मीरमध्ये मोठी कारवाई; लष्कर-ए तोयबाच्या टॉप दहशतवाद्यासह 3 जण ताब्यात

काश्मीरमध्ये मोठी कारवाई; लष्कर-ए तोयबाच्या टॉप दहशतवाद्यासह 3 जण ताब्यात

लष्कर-ए तोयबाचा सहयोगी वसीम गनीसह 3 जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

  • Share this:

बडगाम, 24 मे : काश्मीरच्या बडगाममध्ये पोलीस आणि सुरक्षा दलानं एकत्र कारवाई करून लष्कर-ए तोयबाचा सहयोगी वसीम गनीसह 3 जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. भारतीय सैन्यदलाच्या 53 आरआर युनिटनं ही मोठी कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. या भागातील दहशतवाद्यांना पाठिंबा आणि आश्रय देण्यात वसीम गनीचा हात होता. सुरक्षा दलानं घटनास्थळावरून शस्त्र, दारूगोळा आणि इतर साहित्य जप्त केलं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तान सतत प्रयत्न करत आहे. अलीकडेच पाकिस्तान एक मोठी योजना तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यामध्ये लष्कर आणि जैश-ए-मोहम्मद यांच्या बॅनरखाली दहशतवादी योजना आखण्याची तयारी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 10 दिवसात सुरक्षा दलावर मोठा हल्ला करण्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सुरक्षा दल अलर्ट असून वेगवेगळी ऑपरेशन राबवण्यात येत आहे.

हे वाचा-पाकिस्तानातून भारतात येणार 300 नागरिक, अटारी बॉर्डवरून येणार मायदेशी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेच्या जवळील भागात लष्कर, हिजबुल आणि अल-बद्र अतिरेक्यांनी एकत्र येत लाँच पॅड तयार केला आहे. दुसऱ्या बाजुला पीओकेकडून 16 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

हरदुलिना बीरवाह इथे राहणाऱ्या अब्दुल अजीज गनीचा मुलगा वसीम गनी सोबत फारुक अहमद डार, मोहम्मद यासीन, अजहरुद्दीन मीर या चार जणांच्या मुस्क्या आवळण्यात यश आलं आहे. देशभरात कोरोना व्हायरसचं संक्रमण सुरू असताना दहशतवाद्यांकडून घुसखोरी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि दहशतवाद्यांच्या कुरापती सतत्यानं सुरू आहेत. भारतीय सैन्याला कोरोना आणि दहशतवाद्याविरोधात दोन्ही पातळीवर लढावं लागत आहे.

हे वाचा-क्वारंटाइन सेंटरमधून निघाला 8 फूट लांब विषारी साप, पुढे काय झालं वाचा

हे वाचा-GROUND REPORT : 'बंबई से गई पूना, पूना से गई पटना', तरीही घर येईना!

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 24, 2020, 2:57 PM IST

ताज्या बातम्या