काँग्रेसची बैठक
राहुल गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसची आणखी एक मोठी बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेण्यात येणार आहे.
ममतांचं आंदोलन
ममता विरुद्ध केंद्र सरकार हा वाद अजूनही थांबताना दिसत नाही. अशातच ममता बॅनर्जीच्या आंदोलनाला देशभरातल्या इतर राज्यातल्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता हा संघर्ष कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अण्णा हजारे उपोषणावर ठाम
अण्णा हजारे यांचं उपोषण आज सातव्या दिवशीही सुरुच आहे. 'गिरीश महाजन लोकांची दिशाभूल करत आहेत. मी त्यांच्यासोबतच्या चर्चेनंतर समाधानी नाही,' असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
विमानाचं पुनरूज्जीवन
एअरफोर्सच्या विमानाचं पुनरूज्जीवनाबाबत एक कार्यक्रम नाशिकमध्ये होणार आहे. या अनोख्या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.
नाणारचा वाद
नाणार इथल्या रिफायनरी प्रकल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. अशातच रत्नागिरीमध्ये रिफायनरीसंदर्भातली मतं जाणून घेण्यासाठी सुकथणकर समिती येणार आहे.