पाकिस्तानी Drones नष्ट करण्यासाठी Indian Armyचा 'मेगा प्लान'

पाकिस्तानी Drones नष्ट करण्यासाठी Indian Armyचा 'मेगा प्लान'

अशा ड्रोन्सच्या माध्यमातून पाकिस्तान काही अतिरेकी गटांना शस्त्र पुरवत असल्याचं उघड झालंय.

  • Share this:

नवी दिल्ली 15 ऑक्टोंबर : पाकिस्तान पंजाब सीमेवरून  भारतात ड्रोन्सच्या साह्याने शस्त्रास्त पाठवत असल्याचं सिद्ध झाल्याने खळबळ उडाली होती. आता भारतीय सुरक्षा संस्था अलर्ट झाल्या असून पाकिस्ताचा नापाक इरादा हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने मेगा प्लान तयार केलाय. पाकिस्तानी ड्रोन्स भारतीय हद्दीत घुसूच न देण्यासाठी सीमेवर खास उपाय योजना करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर एखादं ड्रोन्स घुसलं तर लगेच त्याला नष्ट करण्यासाठी खास अत्याधूनिक डोन्स भारतीय लष्कर खरेदी करणार आहे. लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी घेतलेल्या कमांडर्सच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

अशा ड्रोन्सच्या माध्यमातून पाकिस्तान शस्त्र काही अतिरेकी गटांना पुरवत असल्याचं उघड झालं होतं. असे काही ड्रोन्स भारतीय सैन्याच्या हाती लागले असून ते चीनी बनावटीचे असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे लष्कराने लगेच उपाययोजना करायला सुरुवात केलीय.

आदित्य ठाकरेंचा 'लुंगी' प्रचार, लोकांनी करून दिली बाळासाहेबांची आठवण!

सप्टेबर महिन्यात भारत आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ पंजाब पोलिसांना एक ड्रोन सापडलं होतं. या ड्रोनमधून पंजाबमध्ये शस्त्रास्त्रं टाकली जात होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. याआधी, पंजाब पोलिसांनी एक अर्धवट जळालेलं वाहन जप्त केलं होतं. या वाहनातून पाकिस्तानमधून शस्त्रास्त्रं आणली जात होती. पंजाब आणि शेजारच्या राज्यात दहशत पसरवण्याचा हेतू यामागे होता.

पंजाबमधल्या महावा गावातही एक ड्रोन सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी 4 जणांना अटक केली होती. खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी गटाच्या या कारवाया होत्या, असं तपासात आढळून आलं. या दहशतवाद्यांसोबत जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना या हल्ल्याचा कट रचत होती. या ड्रोनमध्ये हत्यारं, नकली चलन असं काही होतं का याबद्दल पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

PMC बँक घोटाळा: खातेदाराचा जीव गेला, घोटाळेबाज मजेत, सरकार ढिम्म-प्रियंका गांधी

आणखी 4 ड्रोन

सीमेवरच्या तरनतारन या भागात आसपासच्या भागात आणखी 4 ड्रोन लपवून ठेवण्यात आले आहेत, असंही पोलिसांनी सांगितलं होतं. या ड्रोनमधून शस्त्रं आणली जात होती पण वजन जास्त झाल्यामुळे हे ड्रोन जाळून नष्ट करण्यात आले. पाकिस्तानमधून पंजाबमध्ये हत्यारं आणि स्फोटकं पाठवली जात होती, असं पंजाब सरकारने म्हटलं होतं. पंजाब पोलिसांच्या सांगण्यानुसार, मोठ्या प्रमाणात एके - 47 रायफल्स आणि ग्रेनेड मोठ्या प्रमाणात अमृतसरला पाठवण्याचा डाव होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2019 09:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading