अरुण जेटली यांच्याबद्दलच्या 'या' 5 खास गोष्टी, ज्यामुळे ते इतर नेत्यांपेक्षा ठरले वेगळे

मागील तीन दशकांपासून देशातील नामांकित वकिलांमध्ये जेटली यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जात होतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2019 03:37 PM IST

अरुण जेटली यांच्याबद्दलच्या 'या' 5 खास गोष्टी, ज्यामुळे ते इतर नेत्यांपेक्षा ठरले वेगळे

1. अरुण जेटली यांची आधी चार्टर्ड अकाऊंटन्ट होण्याची इच्छा होती. पण ते शक्य न झाल्याने त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. त्यानंतर 1987 त्यांनी वकिली पेशाला सुरुवात केली. मागील तीन दशकांपासून देशातील नामांकित वकिलांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जात आहे.

2. अरुण जेटली यांचे वडीलही दिल्लीतील प्रसिद्ध वकिल होते. अरुण जेटली यांनी दिल्लीतील सेंट झेव्हियर या विद्यालयातून शिक्षण घेतलं. त्यानंतर श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स इथून त्यांनी कॉमर्सची डिग्री मिळवली. तसंच 1977 आपलं कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं.

3. कॉलेज सुरू असतानाच जेटली विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले होते. त्यानंतर दिल्ली विद्यापीठात ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षही झाले. विद्यार्थी राजकारणात सक्रिय असूनही अभ्यासाकडे त्यांचं किंचितही दुर्लक्ष झालं नाही. त्यानंतर आणीबाणीमध्ये त्यांना 19 महिने नजरकैदतही ठेवण्यात आलं होतं.

4. जेटली यांनी सुप्रीम कोर्ट आणि देशातील अनेक राज्यांतील हायकोर्टात प्रॅक्टीस सुरू केली. 1990 मध्ये दिल्ली हायकोर्टाने त्यांना सीनिअर अॅडव्होकेटची मान्यता दिली. व्ही. पी. सिंह सरकारमध्ये त्यांना बोफोर्स घोटाळ्याचा पेपरवर्क देण्यात आल्यानंतर अरूण जेटली चर्चेत आले.

5. अरुण जेटली यांना नंतरच्या काळात भाजपने पक्षात आणि सरकारमध्ये अनेक मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी आणि मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...