अजित पवार कुणावर डागणार तोफ? 'या' आहेत 5 मोठ्या बातम्या

अजित पवार कुणावर डागणार तोफ? 'या' आहेत 5 मोठ्या बातम्या

केंद्रातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4 हजार रूपये जमा होणार असल्याची माहिती आहे.

  • Share this:

अजित पवार कुणावर डागणार तोफ?

अमरावतीमध्ये अजित पवार यांची आज जाहीर सभा होणार आहे. अमरावती पासून 50 किलोमीटर अंतरावर परतवाड्याला त्यांची पहिली सभा दुपारी 12 वाजता होईल. तर दुसरी सभा अमरावतीमध्ये रात्री 9 वाजता होईल.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली होती. त्यानंतर आता केंद्रातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4 हजार रूपये जमा होणार असल्याची माहिती आहे.

मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई

मराठा आरक्षणावर आज अंतिम सुनावणी होणार आहे. माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी, माजी अतिरिक्त महाधिवक्ता परमजीत सिंग पाटीवाल हे मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडतील तर, सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारचे वकील निशांत कातनेश्वर मराठा आरक्षणावर राज्य सरकारची बाजू मांडतील. या सुनावणीत नेमकं काय होतं, याकडे राज्यभरातील मराठा बांधवांचं लक्ष असणार आहे.

मातोश्रीवर बैठक

नाणारच्या मुद्यावर तेथील नागरिकांची आमदार-खासदारांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक होणार आहे. नाणारमधील रिफायनरीचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून धगधगत आहे. त्यामुळे मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत नेमकं काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

फडणवीसांचा बीड दौरा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस बीड दौऱ्यावर जाणार आहेत. बीड नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता कार्यक्रम होणार आहे.

First published: February 6, 2019, 6:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading