05जुलै : इकॉनोमिक टाइम्सने नुकताच एक सर्व्हे केलाय. या सर्व्हेमध्ये देशात नोकरी करण्यासाठी सर्वात चांगली जागा कुठली याचा अभ्यास केला गेला. या सर्व्हेनुसार इंट्युट ही देशात काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कंपनी आहे.
इंट्युट ही 2005 साली स्थापन झालेली एक आयटी कंपनी आहे. या कंपनीत एकूण 948 कर्मचारी काम करतात. मागच्या वर्षी हीच कंपनी याच लिस्टमध्ये 10व्या नंबरवर होती.
तर जगाला मोहिनी घालणारी गुगल याच लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या लिस्टमध्ये 10पैकी 7 कंपनी या आयटी सेक्टरच्या आहेत. डीएचएलही एकच ट्रान्सपोर्ट सेक्टरची कंपनी आहे. याशिवाय अॅडोब , सॅप लॅब्स, नेट अॅप याही कंपनींचा समावेश आहे.