S M L

रविवारी ओला-उबेर चालकांचा संप!

ओला आणि उबेरचे ड्राईव्हर पुन्हा एकदा डिवाईस बंद करून विरोध प्रदर्शन करणार आहे. उद्या दिल्ली, मुंबई, गुरुग्राम आणि अन्य शहरातील लोकांना अडचण होऊ शकते.

Sonali Deshpande | Updated On: Mar 17, 2018 03:04 PM IST

रविवारी ओला-उबेर चालकांचा संप!

17 मार्च : ओला आणि उबेरने कायम प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ओला आणि उबेरचे ड्राईव्हर पुन्हा एकदा डिवाईस बंद करून विरोध प्रदर्शन करणार आहे. उद्या दिल्ली, मुंबई, गुरुग्राम आणि अन्य शहरातील लोकांना अडचण होऊ शकते. सकाळी ८पासून चालक आपले डिवाईस बंद करुन आपलं विरोध दर्शवणार आहेत. त्यामुळे  गुढीपाडव्याच्या दिवशी ओला आणि उबरने ग्राहकांना वेठीस धरलंय.

कमी रेटिंगच्या ड्राईव्हरची पुन्हा नियुक्ती करावी आणि वाहनानुसार भाडं निश्चित करावं अशा विविध मागण्यासाठी चालक कामबंद आंदोलन करणार आहेत. फक्त मुंबईमध्ये ४५००० कॅब आहेत. पण सध्या या व्यवसायात २० टक्के घट झाली आहे. लोनवर गाडी घेऊन काम करणाऱ्या चालकांना लोनचा हप्ता देखील भरणं कठीण झालं आहे. त्यामुळे त्यांच्या गाड्या बँकेकडून जप्त होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2018 03:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close