बंगळुरू, 14 मे : कर्नाटकमध्ये उद्या मतमोजणी आहे आणि त्यासाठी सर्व 38 मतमोजणी केंद्रांना छावणीचं स्वरूप आलंय. पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीयेत. मतदार केंद्रांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपी किंवा डीसीपी स्तराच्या अधिकाऱ्यांवर असणार आहे.
वैध ओळखपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांनाच मतदान केंद्राच्या परिघात प्रवेश असणार आहे. पोलीस, निम लष्करी दल, कर्नाटक राखीव पोलीस दल आणि साध्या वेशातले पोलीस, या सर्वांवर संयुक्तिकपणे सुरक्षेची जबाबदारी आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा