Home /News /national /

जागतिक स्तरावरची मोठी बातमी; अखेर ऑलिम्पिक पुढे ढकलणार

जागतिक स्तरावरची मोठी बातमी; अखेर ऑलिम्पिक पुढे ढकलणार

जगभरात नावाजली जाणारी आणि सर्वात मोठी समजली जाणारी ऑलिम्पिक (Tokyo olympics ) ही स्पर्धाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 24 मार्च : चीनमधून अन्य देशात पसरलेला कोरोना व्हायरस (Coronavirus)सध्या जगभर धुमाकूळ घालत आहे. या व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये उलथापालथ सुरू असून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. याच कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत अनेक क्रीडास्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आता जगभरात नावाजली जाणारी आणि सर्वात मोठी समजली जाणारी ऑलिम्पिक (Tokyo olympics ) ही स्पर्धाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधीच भारतातील क्रिकेटची लोकप्रिय स्पर्धा असलेली IPL 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता यंदाच्या वर्षी होणाऱ्या बहुप्रतीक्षित Tokyo olympics लाही कोरोनाचा फटका बसला असून ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही स्पर्धी पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये घेण्यात येणार आहे. 90 हजार कोटींची गुंतवणूक पाण्यात? ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आल्याने 90 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पाण्यात जाणार आहे. त्यामुळे हे प्रचंड मोठं आर्थिक संकटही ठरू शकेल. जपानने आतापर्यंत या जागतिक स्पर्धेच्या आयोजनावर 90 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याने मोठं आर्थिक नुकसान जपानला सोसावं लागणार आहे. IPL रद्द होणार? कोरोनाचा फटका इतर खेळांबरोबरच क्रिकेटलाही बसला आहे. त्यामुळे भारतातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगवर म्हणजेच आयपीएलवर टांगती तलवार आहे. सध्या कोरोनामुळे आयपीएलचे तेरावे हंगाम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळं 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा आता 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. असे असले तरी, कोरोना प्रादर्भावर वाढल्यास आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द केला जाऊ शकतो.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या