• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Tokyo Olympic : नीरज गोल्ड मेडल जिंकला म्हणून 501 रुपयांचं पेट्रोल फ्री, अट फक्त एकच!

Tokyo Olympic : नीरज गोल्ड मेडल जिंकला म्हणून 501 रुपयांचं पेट्रोल फ्री, अट फक्त एकच!

नीरजला गोल्ड मेडल मिळालं म्हणून पेट्रोल फ्री

नीरजला गोल्ड मेडल मिळालं म्हणून पेट्रोल फ्री

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास घडवला. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) नीरजने भारताला स्पर्धेतलं पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं.

 • Share this:
  भरूच, 8 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास घडवला. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) नीरजने भारताला स्पर्धेतलं पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. ऑलिम्पिक इतिहासातलं भारताचं हे दुसरं, तर ऍथलिटिक्समधलं पहिलं गोल्ड मेडल आहे. नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गुजरातमधल्या एका पेट्रोल पंप चालकाने तर नीरज गोल्ड मेडल जिंकला म्हणून 501 रुपयांचं पेट्रोल फ्री देणार असल्याची घोषणा केली आहे. सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरूचमधल्या पेट्रोल पंपावर 501 रुपयाचं पेट्रोल फ्री मिळणार आहे, यासाठी अट फक्त एकच आहे. फ्री पेट्रोल मिळवण्यासाठी व्यक्तीचं नाव नीरज असणं गरजेचं आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. नीरजने ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला एक गोल्ड, दोन सिल्व्हर आणि 4 ब्रॉन्झ अशी एकूण 7 मेडल मिळाली. एका ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भारताने एवढ्या पदकांची कमाई केली आहे. कुस्तीमध्ये रवी कुमार धहियाने (Ravikumar Dahiya) तर वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने (Mirabai Chanu) सिल्व्हर मेडल मिळवलं. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu), भारतीय पुरुष हॉकी टीम (Indian Men Hockey Team), बॉक्सर लोवलीना बोरगोहेन (Lovlina Borgohain) आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांना ब्रॉन्झ मेडल मिळालं. गोल्डन बॉय नीरजवर पैशांचा पाऊस, 3 तासात मिळाले 13 कोटी रुपये
  Published by:Shreyas
  First published: