VIDEO : आश्चर्य! सहाव्या मजल्यावर लटकणाऱ्या लहानग्याला असं वाचवलं!

एका लहानग्याचा सहाव्या मजल्यावरून पडतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. इथल्या स्थानिकांनी प्रसंगावधान राखून त्याला वाचवलं.अक्षरश: चमत्कारानेच तो वाचला.

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 04:39 PM IST

VIDEO : आश्चर्य! सहाव्या मजल्यावर लटकणाऱ्या लहानग्याला असं वाचवलं!

मुंबई, 3 ऑगस्ट : एका लहानग्याचा सहाव्या मजल्यावरून पडतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. इथल्या स्थानिकांनी प्रसंगावधान राखून त्याला वाचवलं.अक्षरश: चमत्कारानेच तो वाचला.

BBC न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधल्या चाँगकिंग भागातला हा व्हिडिओ आहे. हा लहानगा सहाव्या मजल्यावरून खाली पडला. तो पडताना पाहून खालच्या लोकांनी लगेचच एक ब्लँकेट धरलं आणि त्याला अलगद या ब्लँकेटमध्ये झेललं.

या इमारतीत काम करणाऱ्या एका महिलेने या लहानग्याला सहाव्या मजल्यावर लटकताना पाहिलं. तिने लगेचच जवळच्या माणसांना सावध केलं. या सगळ्यांनी ब्लँकेट धरेपर्यंत हा लहानगा खाली कोसळला पण त्याचा जीव वाचवण्यात यश आलं.

हा मुलगा घरी एकटाच होता, असं पोलिसांनी म्हटलं आहे. या मुलाला वाचवण्याचा हा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. ब्लँकेटमध्ये झेलल्यानंतर या लहानग्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं. आता त्याचा जीव वाचला आहे.

OMG VIDEO : सेल्फीवेड्या लोकांसाठी हे आहे 3 D सेल्फी म्युझियम!

या मुलाला वाचवणाऱ्या महिलेचं सगळीकडे कौतुक होतंय. पण तरीही इतक्या लहान मुलाला घरी एकटंच कसं ठेवलं यावरून नेटकऱ्यांनी या मुलाच्या पालकांवर टिकेची झोड उठवली आहे. या इमारतीत काम करणाऱ्या महिलेचं लक्ष गेलं नसतं तर हा लहानगा सहाव्या मजल्यावरून खाली पडू दगावला असता या विचारानेच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.

==========================================================================================

काळीज पिळवटून टाकणारा VIDEO, नदी ओलांडताना क्षणात वाहून गेल्या गायी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 04:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...