पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे खिशाला कात्री, 5 दिवसांत पाहा किती महागलं इंधन

पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे खिशाला कात्री, 5 दिवसांत पाहा किती महागलं इंधन

तुमच्या शहरात काय आहेत आजचे इंधनाचे दर जाणून घ्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: मागील 5 दिवसांपासून पेट्रोलचे दर वाढत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. सलग पाचव्या दिवशी जवळपास पेट्रोलने 80चा दर गाठला आहे. आधीच अवकाळी पावसामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. दिल्लीत मागिल 5 दिवसांपासून लिटरमागे 75 पैशांनी पेट्रोल महाग झालं आहे.

इंडियन ऑईलने आपल्या वेबसाईटवर जारी केलेले दर पुढील प्रमाणे आहेत.

दिल्ली- पेट्रोल- 74.05 रुपये डिझेल- 65.79 रुपये.

मुंबई- पेट्रोल- 79.71 रुपये डिझेल- 69.01 रुपये.

कोलकाता- पेट्रोल- 76.74 रुपये डिझेल- 68.20 रुपये.

चेन्नई- पेट्रोल- 76.97 रुपये डिझेल- 69.54 रुपये.

मुंबई पेट्रोलचे सर्वाधिक म्हणजेच जवळपास 80 रुपये लिटरमागे दर आहे. तर दिल्लीमध्ये सर्वात कमी 74 रुपये पेट्रोलचा दर आहे. चेन्नईमध्ये डिझेलचे दर सर्वाधिक 69.54 तर सर्वात कमी दर दिल्लीत आहे.

सकाळी 6 वाजता किंमतींमध्ये होतो बदल

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येक दिवशी वाढ तसंच घट पाहायला मिळते. सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249

बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

First Published: Nov 18, 2019 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading