Elec-widget

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; 'हे' आहेत आजचे दर

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; 'हे' आहेत आजचे दर

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol, Diesel )आजच्या किमती काय आहेत, ते घ्या जाणून

  • Share this:

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वधारल्या आहेत. आधीच अवकाळी पावसामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दरही कमी होण्याच नाव घेत नाहीत. त्यामुळे गृहिणींचं बेजट चांगलचं कोलमडलं आहे. मुंबई, चेन्नई आणि दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटरमागे 10 पैसे तर कोलकातामध्ये 9 पैशांनी वधारलं आहे. तर मुंबई आणि कोलकातामध्ये डिझेल 12 पैशांनी स्वस्त झालं आहे. चेन्नईत तब्बल 13 पैशांनी डिझेलचे दर कमी झाल्याचं पाहायला मिळालं. सलग 5 दिवस पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. आर्थिक मंदीचा आणि अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे भाज्या, मासे यांचे दरही अक्षरश: गगनाला भिडले आहे.

काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

इंडियन ऑयल (Indian Oil)च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार असे आहेत चार राज्यांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर.

मुंबई- पेट्रोल- 78.97 रुपये. डिझेल- 69.01 प्रतिलिटर

दिल्ली- पेट्रोल- 73.30 रुपये. डिझेल- 65.79 प्रतिलिटर

Loading...

कोलकाता- पेट्रोल- 76 रुपये. डिझेल-68.20 प्रतिलिटर

चेन्नई- पेट्रोल- 76.18 रुपये.  डिझेल-69.54 प्रतिलिटर

सकाळी 6 वाजता किंमतींमध्ये होतो बदल

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येक दिवशी वाढ तसंच घट पाहायला मिळते. सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249

बीपीसीएल ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

SPECIAL REPORT: सत्ता स्थापनेवरुन नेटिझन्सनी शिवसेनेला केलं ट्रोल; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 09:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...