महाराष्ट्र दिनापासून ते मोदी आणि राहुल गांधी, दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र दिनापासून ते मोदी आणि राहुल गांधी, दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

आज दिवसभरातील या 5 महत्त्वाच्या बातम्यांकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.

  • Share this:

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्या

1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त हुतात्मा स्मारकाला अभिवादन

1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित असणार आहे.

महाराष्ट्र दिनाविरोधात नागपूरात विदर्भावाद्यांचे आंदोलन

महाराष्ट्र दिनाविरोधात नागपूरात विदर्भावाद्यांचे आंदोलन करण्यात येणार आहे. वेगळ्या विदर्भासाठी आजच्या दिनी हे आंदोलन करण्यात येणार आहे. आधीपासून संयुक्त महाराष्ट्राला विदर्भवाद्यांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आज महाराष्ट्र दिनाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अयोध्येत सभा

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अयोध्येत सभा होणार आहे. त्यासाठी अयोध्येमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर मोदी आज जनतेशी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

राहूल गांधी यांची उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात सभा

संपूर्ण देशभरामध्ये सध्या लोकसभेसाठी प्रचारांच्या फैरी सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आज दोन ठिकाणी प्रचारसभा असणार आहेत. राहुल गांधी यांची आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये जाहीर प्रचारसभा होणार आहे.

First published: May 1, 2019, 6:46 AM IST

ताज्या बातम्या