3 मेपर्यंतचा लॉकडाऊन संपल्यानंतर कधी सुरू होणार रेल्वे? आज निर्णय होण्याची शक्यता

3 मेपर्यंतचा लॉकडाऊन संपल्यानंतर कधी सुरू होणार रेल्वे? आज निर्णय होण्याची शक्यता

आज देशाचे कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा आणि रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत रेल्वेसेवा कधीपासून सुरू होणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 एप्रिल : रेल्वे मंत्रालय (Ministry of Railway) आणि केंद्र सरकारच्या (Central Government) वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये देशातील रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याबात चर्चा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कोरोना व्हायरस लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) नंतरच्या काळासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. कोरोनाच्या संकटकाळात रेल्वे सुरू केल्यास कोणत्या बाबींकडे लक्ष देण्याची अधिक गरज आहे, त्याबाबत देखील चर्चा करण्यात येणार आहे. 22 मार्चपासून रेल्वेच्या सर्व पॅसेंजर सेवा बंद आहेत. 3 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी असल्याने तोपर्यंत कोणतीही ट्रेन धावणार नाही आहे. मात्र 14 एप्रिलपासून रेल्वेने पुढील बुकिंग्स सुद्धा रद्द केले आहेत.

(हे वाचा-आधार अपडेट करण्यासाठी UIDAIने दिली नवी माहिती,आता याकरता बँकेत जाण्याची गरज नाही)

सध्याच्या काळात भारतामध्ये साधारण रोज 1000 पेक्षा जास्त नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. भारतामध्ये सध्या कोरोना रुग्णांचा आकडा 31 हजारांवर पोहोचला आहे. यामध्ये 22 हजारांपेक्षा अधिक जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत तर 7,696 रुग्ण बरे झाले आहेत. अशा परिस्थितीत सूत्रांच्या माहितीनुसार रेल्वे सेवा पुन्हा सुरू होण्याची आशा धूसरच आहे.

अनेक राज्यांनी प्रवासी मजूरांना परत पाठवण्यासाठी स्पेशल ट्रेन्स सुरू करण्याची मागणी केली आहे. तर रेल्वेकडे अशी मागणी देखील आली आहे की, सुरूवातीच्या काळात एसी सेवा सुरू न करता साध्या ट्रेन सुरू करण्यात याव्यात. जेणेकरून कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे रेड झोन असणाऱ्या भागात रेल्वेसेवा अद्याप सुरू करू नये.

(हे वाचा- लॉकडाऊननंतर विमान प्रवास करायचा आहे? दाखवावं लागणार मेडिकल सर्टिफेकेट)

अनेक स्टेशनवर न थांबता एका स्टेशनवरून थेट शेवटच्या स्टेशनपर्यंत धावणाऱ्या ट्रेन सुरू कराव्यात आणि दोन्ही ठिकाणी प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्यात यावं. या सुद्धा नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश रेल्वेकडून मिळण्याची शक्यता आहे.

आजच्या बैठकीत रेल्वे सुरू करण्याबाबतचा निर्णय झाल्यास सुरूवातीच्या काळात किती प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी याबाबत देखील चर्चा होणार आहे. ट्रेन ऑपरेशन सुरू झाल्यास येणाऱ्या संकटांबाबतही चर्चा होईल. ट्रेन्स कधी पर्यंत बंद ठेवणार याचा अंतिम निर्णय केंद्र सरकारचा राहील.

संपादन- जान्हवी भाटकर

First Published: Apr 29, 2020 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading