S M L

कर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागांसाठी एकाच दिवशी म्हणजे १२ मे रोजी मतदान होणार आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 25, 2018 04:26 PM IST

कर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

24 एप्रिल : कर्नाटक विधानसभेसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागांसाठी एकाच दिवशी म्हणजे १२ मे रोजी मतदान होणार आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून २७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येतील.

काल अनेक उमेदवारांनी आपले निवडणूक अर्ज दाखल करताना मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं, त्यामुळे अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आजही राज्यभर अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे.

आज कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथील मतदारसंघातून आपला दुसरा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दक्षिण कर्नाटकामधील चामुंडेश्वरी येथील मतदारसंघातून त्यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2018 09:14 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close