झटपट वाचा आज दिवसभरातील या 5 महत्त्वाच्या बातम्या

झटपट वाचा आज दिवसभरातील या 5 महत्त्वाच्या बातम्या

बुधवारी संपूर्ण देशभरात घडणाऱ्या या महत्त्वाच्या बातम्यांकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

  • Share this:

देशभर होळीच्या सणाचा उत्साह

बुधवारी देशभर होळीचा सण साजरा होणार आहे. त्यामुळे देशभरात अनेक आकर्षक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल. त्यामळे बुधवार हा नव्या रंगानी सजणार आहे.

शरद पवार काय बोलणार?

माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह यांनी बंड पुकारले असून आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत शरद पवार काय भूमिका मांडतात हे पाहण्याचं ठरणार आहे.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजप प्रवेश

राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह पाटील मोहिते पाटील आज 12.30 वाजेच्या सुमारास भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजपकडून माढ्यातून रणजितसिंह यांना उमेदवारीही निश्चित समजली जात आहे.

पार्थ पवारांची दुसरी सभा

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थला मावळ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर  पार्थ दुसऱ्यांदा कार्यकर्त्यांच्या समोर जाणार आहे. आज राष्ट्रवादीचा पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा पार पडणार आहे. यावेळी पार्थ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे.

होळी निमित्ताने पंतप्रधानांचा ऑडिओ संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होळीच्या निमित्तानं ऑडीओ ब्रिजच्या माध्यमातून 25 लाख चौकीदारांशी संवाद साधणार आहे. संध्याकाळी 4.30 वाजता ते सर्वांशी ऑडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते ऐकूणच काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

First published: March 20, 2019, 6:22 AM IST

ताज्या बातम्या