गेल्या निवडणुकीत यांचा अंदाज ठरला तंतोतंत खरा; यावेळीचा Exit Poll आहे असा!

लोकसभा निवडणुकीत भाजपला 300 जागा मिळतील असा अंदाज चाणक्यने वर्तवला आहे. तर भाजप नेतृत्वाखालील NDAला

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 08:31 AM IST

गेल्या निवडणुकीत यांचा अंदाज ठरला तंतोतंत खरा; यावेळीचा Exit Poll आहे असा!

नवी दिल्ली, 19 मे: लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय तज्ञांचे आणि एक्झिट पोलचे अंदाज चूकवत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर काँग्रेसचा ऐतिहासिक असा पराभव झाला होता. भाजपच्या या विजयाबद्दल अनेकांना धक्का देखील बसला होता. देशाचे राजकीय चित्र बदलणाऱ्या या निवडणुकीचा अचूक अंदाज मात्र एका संस्थेने व्यक्त केला होता. 2014मध्ये भाजपच्या विजयाची जेवढी चर्चा झाली होती तेवढीच चर्चा या संस्थेच्या एक्झिट पोलबद्दल झाली होती.

चाणक्य या संस्थेने 12 मे 2014 रोजी भाजपच्या विजयाबद्दलचा अचूक अंदाज व्यक्त केला  होता. तेव्हा भाजपला 392 (/-14) जागा मिळतील असे चाणक्यने सांगितले होते. प्रत्यक्षात  16 मे रोजी भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. आता देखील 2019चा चाणक्यचा संपूर्ण देशाचा आणि प्रत्येक राज्यातील एक्झिट पोल जाहीर झाला आहे.

काय सांगतोय चाणक्यचा 2019चा एक्झिट पोल

लोकसभा निवडणुकीत भाजपला 300 जागा मिळतील असा अंदाज चाणक्यने वर्तवला आहे. तर भाजप नेतृत्वाखालील NDAला  350 जागा मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसला यंदा देखील दुहेरी संख्या पार करता येणार नाही. या एक्झिट पोल नुसार त्यांना 55 जागा मिळणार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांना 44 जागा मिळाल्या होत्या हे विशेष. तर काँग्रेस नेतृत्वाखालील UPAला 95 जागा मिळणार आहेत. तर अन्य पक्षांना 97 जागा मिळतील.

Exit Poll 2019: काँग्रेसचा ‘हुकमी एक्का’ प्रियांका गांधी पहिल्याच परीक्षेत नापास!

Loading...भाजप नेत्यांची झोप उडवणारा Exit Poll, उत्तर प्रदेशात मोदी लाट नाही!

प्रत्येक राज्यात कोणाला किती जागा मिळणार....

उत्तर प्रदेशपश्चिम बंगालपंजाबओडिशाझारखंडबिहारमहाराष्ट्रहिमाचल प्रदेशतेलंगणाआसामआंध्र प्रदेशआसामकर्नाटकराजस्थानतामिळनाडूमध्य प्रदेशउत्तराखंडकेरळदिल्लीहरियाणागुजरातछत्तीसगड


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2019 10:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...