धुलिवंदनानिमित्ताने जावयांची गाढवावरून मिरवणूक; आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या

धुलिवंदनानिमित्ताने जावयांची गाढवावरून मिरवणूक; आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या

दिवसभरातील या महत्त्वाच्या बातम्या तुम्हालाही माहित हव्या.

  • Share this:

धुलिवंदनानिमित्त देशभरात रंगांची उधळण

गुरुवारी देशभरात रंगाची उधळण केली जाणार आहे. धुलिवंदनासाठी देशभरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र धुलिवंदनाचा उत्साह आपल्याला पहायला मिळणार आहे.

मराठी कलावंतांची दादरमध्ये होळी

धुलिवंदनाचं खास आकर्षण महाराष्ट्रातील मुंबईमध्ये पाहायला मिळत. गुरुवारी दादरमध्ये मराठी कलावंत धुलिवंदनाचा आनंद लुटणार आहेत.

धुलिवंदनानिमित्ताने जावयांची गाढवावरून मिरवणूक

धुलिवंदन साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रितीभाती आहे. बीडमध्ये धुलिवंदनाला जावायांची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. त्यामुळे त्यांच्या या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण असणार आहे.

उद्धव ठाकरे आणि अनंत गीते  यांची भेट

शिवेसेनेचे अनंत गीते हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या उद्याच्या भेटीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

वसई- विरार बहुजन विकास आघाडीची पत्रकार परिषद

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुरुवारी वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यातून काय मोठी घोषणा होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2019 06:29 AM IST

ताज्या बातम्या