आज आंतरराष्ट्रीय योगदिन, देशभरात पंतप्रधानांसह दिग्गजांनी केला योगाभ्यास

आज आंतरराष्ट्रीय योगदिन, देशभरात पंतप्रधानांसह दिग्गजांनी केला योगाभ्यास

योग म्हणजे विनामुल्य आरोग्यविमा असा संदेश मोदींनी यावेळी उपस्थितांना दिला. इकडे महाराष्ट्रातही मुख्यमंत्री मुंबईतल्या कार्यक्रमात तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात योगदिन साजरा करतायत.

  • Share this:

21 जून : तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात उत्साहात साजरा झाला. आपल्या देशात तर भल्या सकाळीच ठिकठिकाणी योग शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. योगगुरू रामदेव बाबा आणि अमित शहा अहमदाबादमध्ये योगासनं केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौतल्या कार्यक्रमात योगासनं केली.

योग म्हणजे विनामुल्य आरोग्यविमा असा संदेश मोदींनी यावेळी उपस्थितांना दिला. इकडे महाराष्ट्रातही मुख्यमंत्री मुंबईतल्या कार्यक्रमात तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात योगदिन साजरा करतायत.  एकूणच आज सकाळपासून देशभरात सगळीकडे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होतोय.

आज आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने राज्यातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त मुलांसोबत मुख्यमंत्र्यांनी योग केला. दिव्यज फाॅंडेशनच्या माध्यमातून 600 शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांना दत्तक घेतलं आहे. यात प्रामुख्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचा समावेश आहे. फाँडेशनचे शांतीलाल मुथा आणि मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उपस्थित असलेल्या अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी मुलांशी संवाद साधला आणि योगाचे धडेही दिले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नागपुरात योग अभ्यास केला.इथल्या सामुहिक योगशिबिरात त्यांनी योगासनंही केली.

Loading...

दिल्लीच्या कनॉटप्लेसला योग दिवसाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार राम नाथ कोविंद , शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू , क्रीडा मंत्री विजय गोयल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. राम नाथ कोविंद यांच्याविषयी उपस्थितांमध्य उत्सुकता दिसून आली.

भारतीय आयटीबीपीचे जवानांनी लडाख येथे योग दिनानिमित्ता योगाभ्यस केला. 21 हजार फुटांवर त्यांना हा योगाभ्यास केलाय. उणे 25 डिग्री सेल्सिअसमध्ये हा योगाभ्यास करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2017 09:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...