आज मध्यरात्री होणार तेजस्वी उल्कावर्षाव

वर्षातील भरवशाचा मानला जाणारा मिथुन राशीतील उल्कावर्षाव आज मध्यरात्री दिसणार आहे. उद्या पहाटे या उल्कांचे प्रमाण ताशी १०० ते १२० इतके राहणार असल्याचे इंटरनॅशनल मेटिओर ऑर्गनायझेशनने कळवले आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 13, 2017 02:43 PM IST

आज मध्यरात्री होणार तेजस्वी उल्कावर्षाव

13 डिसेंबर : वर्षातील भरवशाचा मानला जाणारा मिथुन राशीतील उल्कावर्षाव आज मध्यरात्री दिसणार आहे. उद्या पहाटे या उल्कांचे प्रमाण ताशी १०० ते १२० इतके राहणार असल्याचे इंटरनॅशनल मेटिओर ऑर्गनायझेशनने कळवले आहे.

सर्वसाधारणपणे उल्कावर्षाव हे धूमकेतूच्या शेपटीतील धूलीकण वेगाने पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यामुळे दिसतात. मात्र, मिथुन राशीतील उल्कावर्षावाचा स्रोत हा ३२०० फेथन हा लघुग्रह असल्याचे मानले जाते.

या लघुग्रहाचे छोटे तुकडे आणि धूलिकण दर वर्षी ४ ते १७ डिसेंबर या काळात पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. आज रात्री आणि उद्या पहाटे त्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. लघुग्रहाचे तुकडे हे धूमकेतूच्या शेपटीतील धूलीकणांपेक्षा आकाराने मोठे असल्यामुळे या मिथुन राशीतील उल्का अधिक तेजस्वी दिसतात.

वर्षभरात 10 ते 12 उल्कावर्षाव होतात. पृथ्वी धूमकेतूच्या कक्षेत आली की उल्का वर्षाव होतो. त्यावेळी लघुग्रहांचे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात आणि पेट घेतात. म्हणून त्या उल्का तेजस्वी दिसतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 02:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...