S M L

भारतीय रेल्वे झाली 165 वर्षांची !

१६ एप्रिल १८५३ साली ३.३५ वाजता बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे धावली होती

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 16, 2018 06:44 PM IST

भारतीय रेल्वे झाली 165 वर्षांची !

16 एप्रिल: बोरीबंदर ते ठाण्यामध्ये धावलेल्या आशिया खंडातील पहिल्या रेल्वे सेवेला आज 165 वर्ष पूर्ण झाली आहे. गेली 165 वर्ष अविरतपणे रेल्वे राष्ट्राला जोडण्याचं काम करते आहे.

१६ एप्रिल १८५३ साली ३.३५ वाजता बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे धावली होती. 34 किलोमीटरचं हे तासाभरात पूर्ण करण्यात आलं होतं. १४ डब्यांच्या या गाडीत ४०० प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यानंतर रेल्वे कल्याणपासून खंड्याळापर्यंत पसरली. आता मात्र रेल्वेचं जाळं आता देशभर पसरलंय. जगात सर्वात जास्त रेल्वेचं जाळं असलेल्या देशांमध्ये रेल्वेचा समावेश होतो. आज प्रवासी संघटनांनिमित्त विविध कार्यक्रम करण्यात आलं आहे.

गेल्या 165 वर्षात रेल्वेची सेवा प्रचंड बदलली आहे. मेट्रोसारखे आधुनिक प्रकल्प भारतात यशस्वी झाले आहेत. अनेक महानगरांमध्ये लोकल्स जाळं तयार झालं आहे. तरी रेल्वेतील सुरक्षेचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे. आता भारतात नवीन बुलेट ट्रेन येऊ घातलीय पण यामुळे रेल्वेचे मुलभूत प्रश्न सुटणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 06:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close