मराठी बातम्या /बातम्या /देश /

विद्यार्थ्यांनो नो टेंशन, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘परीक्षा पे चर्चा’

विद्यार्थ्यांनो नो टेंशन, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘परीक्षा पे चर्चा’

या कार्यक्रमात पंतप्रधान परीक्षांमुळे येणाऱ्या तणावाचा कसा सामना करावा यासंदर्भात मार्गदर्शन करतील

या कार्यक्रमात पंतप्रधान परीक्षांमुळे येणाऱ्या तणावाचा कसा सामना करावा यासंदर्भात मार्गदर्शन करतील

या कार्यक्रमात पंतप्रधान परीक्षांमुळे येणाऱ्या तणावाचा कसा सामना करावा यासंदर्भात मार्गदर्शन करतील

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 20 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थी, शिक्षण व पालकांशी सकाळी 11 वाजता परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात विशेष करून दिव्यांग विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींना भेटण्याची आणि त्यांना प्रश्न विचाण्याची संधी मिळणार आहे. नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात परीक्षांमुळे येणाऱ्या तणावाचा सामना कसा करावा, यासंदर्भात ते मार्गदर्शन करतील. भारतभरातील तब्बल 2 हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. HRD Ministry ने MyGovच्या संयुक्त विद्यमाने पाच विविध विषयांवर 9 वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या निबंध स्पर्धेतील 1,050 विद्यार्थ्यांची निव़ड परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षांचे वेध लागले आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यांपासून सगळ्यांच्या परीक्षांना सुरूवात होत असते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातल्या विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत. आज 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.  या कार्यक्रमस्थळी दिव्यांग विद्यार्थ्यांना आणण्याची आणि बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. 16 फेब्रुवारी 2018 ला पहिल्यांदा हा कार्यक्रम झाला होता. यावर्षीचा कार्यक्रम हा या उपक्रमातला तिसरा कार्यक्रम ठरणार आहे. परीक्षेला जातांना काय काळजी घ्यावी? या काळात येणाऱ्या ताण- तणावाचं व्यवस्थापन कसं करावं? परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असावा? पालकांची भूमिका आणि भविष्याचं नियोजन अशा सगळ्याच विषयांवर ते विद्यार्थ्यांशी हितगुज करणार असून पालकांनाही सल्ला देणार आहेत.    
First published:

Tags: BJP narendra modi, Delhi, Pariksha pe charcha, Students

पुढील बातम्या