पंतप्रधानांनी देशातील पहिल्या Driverless Metro ला दाखवला हिरवा झेंडा

पंतप्रधानांनी देशातील पहिल्या Driverless Metro ला दाखवला हिरवा झेंडा

देशातल्या पहिल्या ड्रायव्हरलेस मेट्रो सेवेचं व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे उद्धघाटन करण्यात आलं. त्याशिवाय पंतप्रधानांनी ‘एयरपोर्ट एक्सप्रेस लाइन’वर 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (एनसीएमसी) सेवेचीही सुरुवात केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाईनवर देशातील पहिल्या चालकरहित अर्थात ड्रायव्हरलेस (Delhi Metro Driverless Train) मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. या देशातल्या पहिल्या ड्रायव्हरलेस मेट्रो सेवेचं व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे उद्धघाटन करण्यात आलं.

त्याशिवाय पंतप्रधानांनी ‘एयरपोर्ट एक्सप्रेस लाइन’वर 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (एनसीएमसी) सेवेचीही सुरुवात केली आहे. या कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही सामिल झाले होते.

दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाईनवर ड्रायव्हरलेस ट्रेन सेवा सुरू झाल्यानंतर आता पिंक लाईनवरही 2021 च्या मध्यापर्यंत ड्रायव्हरलेस ट्रेन सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' अर्थात एनसीएमसी, एयरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर पूर्णपणे संचालित केलं जाईल. त्याशिवाय देशातील कोणत्याही भागातून जारी रूपे-डेबिट कार्ड असणारा व्यक्ती याचा उपयोग करून या मार्गावर प्रवास करू शकतो. ही सुविधा 2022 पर्यंत दिल्ली मेट्रोच्या संपूर्ण नेटवर्कवर उपलब्ध होईल, अशी माहिती पीएमओकडून देण्यात आली आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: December 28, 2020, 12:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या