नरेंद्र मोदी आणि इम्रान खान आज UN मध्ये येणार आमनेसामने, काश्मीरवर काय बोलणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे दोन्ही नेते आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत एकमेकांच्या समोर येणार आहेत. ते काश्मीरबदद्ल काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 04:43 PM IST

नरेंद्र मोदी आणि इम्रान खान आज UN मध्ये येणार आमनेसामने, काश्मीरवर काय बोलणार?

न्यूयॉर्क, 27 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे दोन्ही नेते आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत एकमेकांच्या समोर येणार आहेत. काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते समोरासमोर येतायत. त्यामुळे ते काश्मीरबदद्ल काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

मोदींच्या भाषणाची वेळ आज रात्री 8:30 ते 9 आहे. त्यानंतर इम्रान खान यांचं भाषण होईल. पंतप्रधान मोदी काश्मीरमधली शांतता आणि विकास यावर भर देतील, अशी शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला सामोरे जातायत. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत नाराजीनाट्य

याआधी भारताचे सार्क देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची जी बैठक झाली त्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या भाषणावर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी बहिष्कार घातला होता.जोपर्यंत काश्मीरमधले निर्बंध उठवले जात नाहीत तोपर्यंत पाकिस्तान भारताशी चर्चा करणार नाही, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. तर जोपर्यंत दहशतवाद सुरू आहे तोपर्यंत भारत - पाकिस्तानची चर्चा होऊ शकत नाही, अशी भारताची भूमिका आहे.

Loading...

या बैठकीत एस. जयशंकर यांचं भाषण संपल्यानंतर जेव्हा ते बैठकीतून बाहेर पडले तेव्हाच शाह मेहमूद कुरेशी तिथे आले.

(हेही वाचा : विधानसभा पोटनिवडणूक : काँग्रेसला धक्क्यांवर धक्के, 54 वर्षांचा बालेकिल्ला गमावला)

तुम्ही या बैठकीला उशिरा का आलात असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, काश्मीरच्या मुद्द्यावर आमचा निषेध असल्याने जयशंकर यांच्या भाषणाच्या वेळी मला थांबायचं नव्हतं. यावर एस. जयशंकर यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

===========================================================================================

मुंबई पोलिसांच्या चर्चेनंतर काय म्हणाले शरद पवार? पाहा UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 04:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...