Home /News /national /

राममंदिर भूमिपूजनाबाबत पंतप्रधान काय बोलणार? आज सकाळी 11 वा. नरेंद्र मोदी करणार 'मन की बात'

राममंदिर भूमिपूजनाबाबत पंतप्रधान काय बोलणार? आज सकाळी 11 वा. नरेंद्र मोदी करणार 'मन की बात'

लस आली तर ती देशभर कशी पोहोचवायची  याचा आराखडाही केंद्र सरकारने तयार केला आहे.

लस आली तर ती देशभर कशी पोहोचवायची याचा आराखडाही केंद्र सरकारने तयार केला आहे.

मन की बात या कार्यक्रमाची सर्वच नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असते. तर आज ते कोणत्याविषयावर संवाद साधणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

    नवी दिल्ली, 26 जुलै : सुमारे दोन दशकानंतर राममंदिराच्या कामाला सुरुवात होणार असून, पुढील दोन आठवड्यात राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाला पंतप्रधान कसे उपस्थित राहणार आणि या कार्यक्रमाला कोणा कोणाला निमंत्रित करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' मध्ये याबाबत काही बोलणार का, याकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे. यासह कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेला देशातील लॉकडाऊन कधी संपणार, याबाबत नरेंद्र मोदी काही सूतोवाच करणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे. राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रतिकात्मक व्हावा, अशी मागणी विरोधकांकडून होत असतानाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत या कार्यक्रमासाठी जाण्याची शक्यता आहे. धर्मनिरपेक्ष देशाच्या पंतप्रधानांनी अशा कार्यक्रमांना जाऊ नये, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीसह इतर काही पक्षांनी केली आहे. आता मन की बातमध्ये नरेंद्र मोदी याबाबत काही भूमिका मांडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आज (26 जुलै) सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅपच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. याची माहिती खुद्द पंतप्रधानांनी ट्विटद्वारे दिली आहे. यापूर्वी त्यांनी जुलै महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होणाऱ्या या साखळीसाठी श्रोत्यांकडून काही सूचना मागविल्या होत्या. 11 जुलै म्हणजे 15 दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी ट्विट करुन जर कुणालाही मन की बातबाबत काही सूचना करायची असेल तर ट्विट आणि इतर समाजमाध्यमांतून द्यावी, असे आवाहन केले होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या