मोदी सरकारची तीन वर्ष पूर्ण, भाजपचं मेगा इव्हेंटचं आयोजन

मोदी सरकारची तीन वर्ष पूर्ण, भाजपचं मेगा इव्हेंटचं आयोजन

16 मे 2014 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते . 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या विधानसभांमध्ये भाजप नवनवीन विजय मिळवत असताना दुसरीकडे विरोधी पक्ष मात्र निष्प्रभ ठरताना दिसत आहेत.

  • Share this:

16 मे : मोदी सरकारची तीन वर्ष आज पूर्ण झाली. 16 मे 2014 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते . 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या विधानसभांमध्ये भाजप नवनवीन विजय मिळवत असताना दुसरीकडे विरोधी पक्ष मात्र निष्प्रभ ठरताना दिसत आहेत.

मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने भाजपने मेगा इव्हेंटचं आयोजन केलं आहे. 26 मे रोजी भाजपच्या प्रचार कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दोन आठवड्यांचा हा कार्यक्रम असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह स्वतः या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत आहेत.केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर यांच्यासह काही प्रमुख मंत्र्यांची टीम कार्यक्रमाची रुपरेषा आखत आहे.

First Published: May 16, 2017 12:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading