152 वर्षांनंतर दुर्बिणीशिवाय दिसणार खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून

152 वर्षांनंतर दुर्बिणीशिवाय दिसणार खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून

या आधी 152 वर्षांपूर्वी म्हणजे 31 मार्च 1866 रोजी चंद्रग्रहण, ब्ल्यूमून आणि सुपरमूनच्या दर्शनाचा योग एकाच वेळी आला होता.

  • Share this:

31 जानेवारी : शहरवासीय आणि खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. तब्बल दीडशेवर्षांनंतर आज पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला 'सुपर ब्लू ब्लड मून' पाहण्याची संधी मिळणार आहे. अशी माहिती 'एमजीएम'च्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ व विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. यापूर्वी अशी खगोलीय घटना १८६६ मध्ये घडली होती. आपल्या साध्या डोळ्यांदेखील दर्शन होऊ शकेल अशी माहिती खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. त्यामुळे खगोलप्रेमींच्या दृष्टीनं ही एक पर्वणीच असणार आहे.

या आधी 152 वर्षांपूर्वी म्हणजे 31 मार्च 1866 रोजी चंद्रग्रहण, ब्ल्यूमून आणि सुपरमूनच्या दर्शनाचा योग एकाच वेळी आला होता. आज सायंकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. त्यानंतर सायंकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्यानं खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होईल. यावेळी आपल्या सर्वाना साध्या डोळ्यांनी देखील या सुपर-ब्ल्यू-ब्लडमूनचं दर्शन घेता येणार आहे.

खग्रास चंद्रग्रहण

- संध्या. 5:18वा. चंद्रग्रहणास सुरुवात

- संध्या. 6.21 ते 7.37 खग्रास चंद्रग्रहण

- एकूण कालावधी : 76 मिनिटं

कुठे दिसणार?

- आशिया, प्रशांत महासागर, ऑस्ट्रेलिया, ईशान्य युरोप, अमेरिकेचा बराचसा भाग

चंद्राचा रंग

- गडद नारिंगी किंवा लाल

- खग्रास चंद्रग्रहण याआधी 31मार्च 1866 रोजी

भविष्यात कधी दिसणार ?

- 31 डिसेंबर 2028 आणि 31 जानेवारी 2037

दरम्यान खग्रास चंद्रग्रहण असल्यानं आज चार तास साईमंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 5 ते रात्री 8.42 वाजेपर्यंत मंदिर बंद असल्यामुळे या वेळेत भक्तांना दर्शन घेता येणार नाही, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली आहे. तसेच, साईबाबांची संध्याकाळची आरतीही रद्द करण्यात आली असून खग्रास चंद्रग्रहण असल्यानं समाधी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमामध्‍ये बदल करण्‍यात आला आहे. तर आज रात्री १०.३० वाजता शेजारती व दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 4.30 वाजता काकड आरती नियमितपणे होईल.

First published: January 31, 2018, 8:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading