नववर्षाच्या पहिल्या दिवशी होणार सुपरमूनचं दर्शन

नववर्षाच्या पहिल्या दिवशी होणार सुपरमूनचं दर्शन

2018 या नववर्षाचा आजचा पहिला दिवस. या वर्षाचा पहिल्याच दिवशी सुपरमूनचं दर्शन होणार आहे.

  • Share this:

01 जानेवारी : 2018 या नववर्षाचा आजचा पहिला दिवस. या वर्षाचा पहिल्याच दिवशी सुपरमूनचं दर्शन होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा खगोलप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, भुवनेश्वर आणि कट्टकमधून हा सुपरमून पाहता येणार आहे.

आज सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी पौष पोर्णिमेला सुरुवात होईल. चंद्र पृथ्वीच्या साधारण तीन लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर असतो. मात्र आज तो तीन लाख 56 हजार किलोमीटर अंतरावर असणार आहे. त्यामुळे तो जास्त चमकदार आणि मोठा दिसणार आहे.

इतकंच नाही तर याच महिन्याच्या 31 तारखेला ब्लू मूनचंही दर्शन होणार आहे. नासानं याबाबतची माहिती दिली आहे. एकाच महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येण्याचा योग अतिशय दुर्मिळ असतो. त्यामुळे वैज्ञानिकांनी 31 तारखेला दिसणाऱ्या मूनला 'ब्लू मून' असं नाव दिलंय.

First published: January 1, 2018, 11:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading