• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • कर्नाटकात आज प्रचाराचा शेवटचा दिवस, भाजपच्या सभा, राहुल गांधींची पत्रकार परिषद

कर्नाटकात आज प्रचाराचा शेवटचा दिवस, भाजपच्या सभा, राहुल गांधींची पत्रकार परिषद

कर्नाटक निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 5 नंतर शांत होणार आहेत. सगळ्याच पक्षांकडून आज जास्तीत जास्त प्रचार करण्याचा प्रयत्न केला जाईल.

  • Share this:
10 मे : कर्नाटक निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 5 नंतर शांत होणार आहेत. सगळ्याच पक्षांकडून आज जास्तीत जास्त प्रचार करण्याचा प्रयत्न केला जाईल. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा आज मुख्यमंत्री सिद्धरामैय्यांच्या बदामी या मतदारसंघात रोड शो घेणार आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सिद्धरामय्याही आज प्रचार करणार आहे. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे कारण २०१९ च्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिलं जातंय. दरम्यान आज प्रचारांच्या मैदानात राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे यात ते कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कर्नाटकमध्ये शनिवारी १२ मे रोजी मतदान आणि मंगळवारी १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे. पण दरम्यान काल, बेळगावमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या रॅलीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याने एकच खळबळ उडालीय. फिरोज शेठ हे काँग्रेसकडून बेळगाव उत्तर मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या गांधीनगर इथे झालेल्या रॅलीत हा प्रकार घडलाय. यावेळी काँग्रेसच्या झेंड्यासोबत पाकिस्तानचा झेंडाही फडकवताना दिसून येत होता. बेळगाव उत्तर मधील काही परिसर अति संवेदनशील भाग समजला जातो. त्यातच निवडणुकीच्या काळात अशाप्रकारच्या घटना काँग्रेसला चांगल्याच महागात पडू शकतात. 2019मध्ये मी पंतप्रधान होण्याच्या स्वप्नावर, होराहुल गांधी म्हणजे रिकाम्या बादलीवाले दबंग आहेत, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर हल्लाबोल चढवलाय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील राहुल गांधी यांच्या पंतप्रधान बनण्याच्या स्वप्नावर, 'राहुल गांधींचं वक्तव्य म्हणजे बाजारात तुरी असल्याचा प्रकार' असल्याचं शरद पवार म्हणालेत. त्यामुळे प्रचार सभांच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांची ही पत्रकार परिषद महत्त्वाची असणार आहे. दरम्यान यात ते काही महत्त्वाची घोषणा करणार आहेत का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.  
First published: