अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आज 2रा दिवस, पहिल्या दिवशी आंदोलनाला थंड प्रतिसाद

अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आज 2रा दिवस, पहिल्या दिवशी आंदोलनाला थंड प्रतिसाद

2011 साली झालेल्या आंदोलनाच्या तुलनेत यंदा शेतकरी संघटनांचीही म्हणावी तेवढी उपस्थिती दिसत नाही आहे.

  • Share this:

24 मार्च : अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला काल रामलीला मैदानावर सुरुवात झाली. मात्र यावेळी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला दिल्लीकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसलं. 2011 साली झालेल्या आंदोलनाच्या तुलनेत यंदा शेतकरी संघटनांचीही म्हणावी तेवढी उपस्थिती दिसत नाही आहे.

पण दरम्यान, यावेळी मोदी सरकार आपल्या कार्यकर्त्यांची अडवणूक करत असल्याचा आरोप अण्णा हजारेंनी काल केला. तर अण्णांना चुकीची माहिती दिली जात असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. त्यामुळे आंदोलनाच्या या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो का यावरच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

First published: March 24, 2018, 9:34 AM IST

ताज्या बातम्या