आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार कुमारस्वामी, शरद पवारांसह अनेक दिग्गजांची हजेरी

आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार कुमारस्वामी, शरद पवारांसह अनेक दिग्गजांची हजेरी

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी हे आज शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे जी परमेश्वर हे शपथ घेणार आहेत.

  • Share this:

23 मे : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी हे आज शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे जी परमेश्वर हे शपथ घेणार आहेत. कुमारस्वामी यांनी खुद्द उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार के आर रमेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष राहणार आहेत.

हा दिमाखदार सोहळा कर्नाटक विधानसभेच्या प्रांगणात होणार आहे. कडाक्याचं ऊन लक्षात घेऊन त्याची वेळ सकाळऐवजी दुपारी 4.30 ची ठरविण्यात आली आहे. असं असलं तरी काँग्रेससोबत पाच वर्ष सरकार चालवण हे मोठं आव्हान असणार आहे असं खुद्द कुमारस्वामी यांनी म्हंटलं आहे.

मुख्यमंत्री म्हणून सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करणं माझ्यासाठी कठीण काम असणार आहे. असं वक्तव्य कुमारस्वामी यांनी केल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. दरम्यान आज होणाऱ्या शपथ अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक गैरहजर राहणार आहेत.

दरम्यान कुमारस्वामींच्या शपथविधीच्या सोहळ्याला कोणकोण उपस्थित राहणार आहे त्यावर एक नजर टाकुयात

- राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस

खासदार - 48

- सोनिया गांधी, नेत्या काँग्रेस

- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस

आमदार (महाराष्ट्र) - 42

खासदार - 04

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

पक्ष - आम आदमी पार्टी

आमदार (दिल्ली) - 66

आमदार (पंजाब) - 20

- मायावती, अध्यक्षा, बसपा

पक्ष - बसपा

आमदार (उ. प्रदेश) - 19

खासदार - 04

- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल

पक्ष - तृणमूल काँग्रेस

आमदार - 211

- 34

- चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश

पक्ष - टीडीपी

आमदार - 103

खासदार - 16

- के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगणा

पक्ष - टीआरएस

आमदार - 90

खासदार - 11

- तेजस्वी यादव, नेते, आरजेडी

पक्ष - आरजेडी

आमदार (बिहार) - 80

खासदार - 03

- अखिलेश यादव, नेते, समाजवादी पार्टी

पक्ष - समाजवादी पार्टी

आमदार (उ. प्रदेश) - 47

खासदार - 07

 

First published: May 23, 2018, 9:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading