S M L
Football World Cup 2018

आज मकरसंक्रांतीला एकमेकांना तिळगूळ देऊन लोक वाढवतायत स्नेहभाव

या दिवसापासून उत्तरायण सुरू होते. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते.

Sonali Deshpande | Updated On: Jan 14, 2018 10:58 AM IST

आज मकरसंक्रांतीला एकमेकांना तिळगूळ देऊन लोक वाढवतायत स्नेहभाव

14 जानेवारी : आज मकर संक्रांत, सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायण सुरू होते. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते.

विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. नवविवाहित वधूचे हळदीकुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला आणि जावयालाही देऊन त्यांच कौतुक केलं जाते. तर अनेक ठिकाणी लहान मुलांची बोरवण केली जाते.

मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज अलाहबादमध्ये गंगास्नानासाठी हजारो लोक जमले होते. पहाटेपासूनच गंगाघाटावर गर्दी होती. उगवता सूर्य, दाट धुकं आणि वाहणारी गंगा. अलाहबादमध्ये आज निसर्गानं मकर संक्रांतीनिमित्त भेटच दिली म्हणायचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2018 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close