पंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस सिंगापूर दौऱ्यावर आहेत. आज ते आशियाई शिखर संमेलनात सहभागी होणार आहे.

  • Share this:

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा  मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आज सादर होणार आहे. मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाचं भवितव्य मागासवर्गीय आयोगाच्या या अहवालावर अवलंबून आहे.  हा अहवाल राज्य सरकारला  प्राप्त झाल्यानंतर तो मुंबई उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे.


इस्त्रोची आणखी एक भरारी


भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो आणखी एक गगनभरारी घेणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीएसएलवी-एमके-३-डी2 या राॅकेटद्वारे  उपग्रह जीसॅट २९ चे प्रक्षेपण करणार आहे.


पंतप्रधान मोदी होणार आशिया समिटमध्ये सहभागी


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस सिंगापूर दौऱ्यावर आहेत. आज ते आशियाई शिखर संमेलनात सहभागी होणार आहे. यावेळी यूएस उपराष्ट्रपती माइक पेन्स यांच्याशी द्विपक्षीय बैठक होणार आहे.


राहुल गांधींची छत्तीसगड दौऱ्यावर


काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी छत्तीसगड दौऱ्यावर आहे. आज ते रंजना कटघोरा येथे पोहोचणार आहे. रंजना, तखतपूर,कवर्धा आणि भिलाई इथं राहुल गांधी सभा घेणार आहे.


 रेल्वेची रामायण एक्स्प्रेस


भारतीय रेल्वे तमिळनाडूतून श्री रामायण यात्रा एक्स्प्रेस सुरू करणार आहे. इंडियन रेल टूरिझम अँड केटरिंग कॉर्प (आईआरसीटीसी)  सांगितलं की, ही ८०० आसन क्षमता असलेली एक्स्प्रेस आहे. मदुराईहून ही एक्स्प्रेस निघेल आणि 15 दिवसांत तमिळनाडुमधील रामेश्वरम इथं पोहचणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2018 06:16 AM IST

ताज्या बातम्या