देशात 24 तासांमध्ये कोरोनाचे 918 नवे रुग्ण, 31 जणांचा मृत्यू

देशात 24 तासांमध्ये कोरोनाचे 918 नवे रुग्ण, 31 जणांचा मृत्यू

सध्या आपल्याला 1,671 एवढ्या बेड्सची गरज असताना आपल्याकडे 1 लाख 5 हजार बेड्स तयार आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

  • Share this:

नवी दिल्ली 12 एप्रिल :  गेल्या 24 तासांमध्ये देशात 918 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 31 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे   देशातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता 8447 वर गेली आहे. 29 मार्चला ही संख्या फक्त 979 एवढी होती. यातल्या 20 टक्के रुग्णांना ICUमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यात 1671 रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागत असून त्यातल्या अनेकांची प्रकृती क्रिटिकल असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. सध्या आपल्याला 1,671 एवढ्या बेड्सची गरज असताना आपल्याकडे 1 लाख 5 हजार बेड्स तयार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. सोशल डिस्टन्सिंगशिवाय कोरोनावर दुसरा उपाय नाही असंही ते म्हणाले.

पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये एक 45 वर्षांची नर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 30 नर्सना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. अशी माहिती हॉस्पिटलच्या मेडिकल सर्व्हिस विभागाचे संचालक संजय पाठारे यांनी दिलीय. काही दिवसांपूर्वीच त्या सुट्टीहून परतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी एका कोरोना रुग्णावर उपचारही केले होते. त्यानंतर त्यांना सौम्य लक्षणे दिसायला लागली होती. त्यामुळे त्यांची टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह निघाली अशी माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 134 रुग्णांची संख्या वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 113 रुग्ण हे मुंबईतच आढळले आहे.

महाराष्ट्राला कोरोना व्हायरसने घातलेला विळखा वाढतच चालला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही 1895 वर पोहोचली आहे.  गेल्या 24 तासात मुंबई, पुणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत 113 रुग्ण आढळले आहे. वरळी, कोळीवाडा, धारावी आणि उपनगरात नवे रुग्ण आढळले आहे. वसई आणि विरारनंतर आता मीरा भाईंदरमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे. आज सकाळपर्यंत  मीरा भाईंदरमध्ये 7 नवे रुग्ण आढळले आहे.  तर पुण्यात 4 रुग्ण आढळून आले. नवी मुंबई, ठाणे महापालिका, वसई विरार इथं प्रतेकी 2 रूग्णांची वाढ झाली आहे.  तर रायगड, अमरावती, भिवंडीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

(संपादन -  अजय कौटिकवार)

First Published: Apr 12, 2020 05:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading