मराठी बातम्या /बातम्या /देश /

भाजपला रोखण्यासाठी गोव्यातही ‘महाराष्ट्र पॅटर्न’?, मात्र काँग्रेसला राष्ट्रवादीची भीती!

भाजपला रोखण्यासाठी गोव्यातही ‘महाराष्ट्र पॅटर्न’?, मात्र काँग्रेसला राष्ट्रवादीची भीती!

भाजपकडून सत्ता खेचून आणण्यासाठी सर्व पक्षांना एक व्हावं लागणार आहे असं राष्ट्रवादीकडून सांगितलं जात आहे. महाराष्ट्रात ही एकी झाल्यामुळेच भाजप सत्तेपासून दूर राहिला.

  • Published by:  Ajay Kautikwar

धवल कुलकर्णी, पणजी 06 डिसेंबर: गोव्यात 2022 मध्ये विधानसभा निवडणुका (Goa Assembly Elections) होणार आहेत. मात्र राज्यात आत्तापासूनच राजकीय पक्ष आपापल्या व्ह्युरचनेला आकार देत आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. गोव्याची जबाबदारी दिग्गज नेते प्रफुल पटेल यांच्याकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने गोव्यात महाराष्ट्रात जो महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या या प्रस्तावावर काँग्रेसमध्ये चिंता व्यक्त होते आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगातून आपल्या मतांवर राष्ट्रवादी डल्ला तर मारणार नाही ना याची भीती काँग्रेसला वाटत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पेक्षा भाजपची गोव्यावर मजबुत पकड आहे. त्यामुळे भाजपकडून सत्ता खेचून आणण्यासाठी सर्व पक्षांना एक व्हावं लागणार आहे असं राष्ट्रवादीकडून सांगितलं जात आहे. महाराष्ट्रात ही एकी झाल्यामुळेच भाजप सत्तेपासून दूर राहिला. हाच प्रयोग गोव्यात करण्यासाठी राष्ट्रवादीने राज्यातल्या इतर छोट्या पक्षांसोबत बोलणीही सुरू केलीय.

चर्चिल अलेमाओ (Churchill Alemao)  हे राष्ट्रावादीचे गोव्यात ऐकमेव आमदार आहेत. काँग्रेसने मात्र राष्ट्रवादीच्या या प्रयोगाबद्दल फारसी उत्सुकता दाखवलेली नाही. जास्त जागा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात फुट पाडेल अशी भीती वाटते आहे.

देशभरातल्या पराभवामुळे काँग्रेसला धक्का बसलाय. काँग्रेसमुळेच बिहारमध्ये सत्तेपासून वंचित राहावं लागलं असा थेट आरोपच राजदच्या काही नेत्यांनी केला होता. त्यामुळे काँग्रेससोबत जाऊनही काही फायदा होत नाही असं वातावरण निर्माण झालं. त्याचा फायदा घेत राज्यात विस्तार करण्याचा राष्ट्रवादीचा विचार असू शकतो अशी शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

First published:

Tags: Goa, Sharad Pawar (Politician)