मराठी बातम्या /बातम्या /देश /

अफवांवर विश्वास ठेवू नका! एका क्लिकवर मिळवा कोरोनाबाबत अचूक माहिती, भारताने तयार केली खास वेबसाईट

अफवांवर विश्वास ठेवू नका! एका क्लिकवर मिळवा कोरोनाबाबत अचूक माहिती, भारताने तयार केली खास वेबसाईट

कोरोनाबाबत अफवा कमी करण्याच्या हेतूने, एका भारतीय कंपनीने नवी वेबसाईट तयार केली आहे.

कोरोनाबाबत अफवा कमी करण्याच्या हेतूने, एका भारतीय कंपनीने नवी वेबसाईट तयार केली आहे.

कोरोनाबाबत अफवा कमी करण्याच्या हेतूने, एका भारतीय कंपनीने नवी वेबसाईट तयार केली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 16 मार्च : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस साऱ्या जगात वाढत आहे. भारतातही कोरोना वेगाने पसरत आहे. भारतात 110हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, येत्या काही दिवसांत हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकार तयारी करत आहे. मात्र एकीकडे सरकार कोरोनाबाबत जनजागृती करत असताना, या व्हायरसबाबत मोठ्या प्रमाणात अफवाही पसरवल्या जात आहेत. यावर उपाय म्हणून भारताने आता एक डॅशबोर्ड तयार केला. या डॅशबोर्डच्या माध्यमातून एकाच ठिकाणी कोरोनाबाबतची सर्व माहिती आणि सूचना लोकांना मिळू शकतात.

वाचा-Coronavirus Live Updates : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय

कोरोनाबाबत अफवा कमी करण्याच्या हेतूने, किप्रोश या कंपनीने हा डॅशबोर्ड भारतात विकसित केला आहे. यात सरकारी डेटासह कोरोनासंबंधित सर्व माहिती एकत्रित करण्यात आली आहे. यामुळे कोविड-19बाबतची सर्व माहिती लोकांना एका क्लिकवर मिळू शकते. तसेच, कोरोनाग्रस्त रुग्णांचे अचुक आकडे आणि रुग्णालयाबाबतची माहितीही यावर मिळणार आहे.

वाचा-पुण्यात पहिला गुन्हा दाखल, कोरोनाची अफवा पसरवणं पडलं महागात

ही सर्व माहिती विनाशुल्क एका क्लिकवर मिळू शकते. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी http://covidout.in/ या वेबसाईटवर क्लिक करून तुम्हाला Covid-19 बाबत अधिक माहिती मिळू शकते.

वाचा-कोरोनापासून वाचण्यासाठी Work From Home करताय? मग लक्षात ठेवा या गोष्टी

कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई होणार

कोरोनाबाबत सोशल मीडियावर किंवा कोणत्याही प्रकारे अफवा पसरवणाऱ्यांवर सरकारच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली आहे. याअंतर्गत पुण्यात आज पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पुंढरपूरसह काही राज्यांमध्ये कारवाईही करण्यात आली आहे. अफवा टाळण्यासाठी आणि कोरोनाबाबत अचूक माहिती पोहचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

First published: