बापरे! सप्तपदी घेताना पतीनं नववधूला पाडलं तोंडावर, VIDEO VIRAL

बापरे! सप्तपदी घेताना पतीनं नववधूला पाडलं तोंडावर, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहाल तर हसू आवरल्याशिवाय राहणार नाही.

  • Share this:

मुंबई,  21 सप्टेंबर : आपल्या देशात लग्न म्हटलं अनेक वेगवेगळे रितीरिवाज येतात. देशातील वेगवेळ्या जाती-धर्माचे लोक राहत असल्यानं प्रत्येचे रितीरिवाजही वेगवेगळे असतात. प्रत्येकाची लग्नाची एक खास गोष्ट असते. पण हे सर्व रितीरिवाज पार पाडताना अनेक गंमती-जमतीसुद्धा होताना दिसतात. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहाल तर मात्र तुम्ही कपाळाला हात लावाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीमध्ये एका बंगाली लग्नाच्या विधी पार पडताना दिसत आहेत. यात एक विधी असाही असतो की लग्नाच्यावेळी वरानं वधूला उचलून  घ्यावं लागतं मात्र या वधूला तिच्या होणाऱ्या पतीनं उचलून घेतल्यानंतर जे काही झालं ते पाहून कोणलाच हसू आवरल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

दीपवीरच्या IIFA लुकवर नेटकरी सैराट, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

हा व्हिडीओ पाहिल्यावर त्या नवरीची काय अवस्था झाली असेल याचा विचार न केलेलाच बरा. एकंदर लग्नासारख्या आनंदाच्या क्षण असं काहीतरी घडणं तिला अपेक्षित नसेलच पण ज्यांना लग्नाच्या गोड आठवणींची अपेक्षा असते त्या ठिकाणी या नवरीला हा प्रसंग मात्र आयुष्यभर लक्षात राहिल हे नक्की!

VIRAL VIDEO : IIFA अवॉर्ड फंक्शनमध्ये सलमान खानच्या मागे लागला कुत्रा

===========================================================

VIDEO: दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 09:34 AM IST

ताज्या बातम्या