लोकांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचा 14 हजार फुटांवर 11 तासांचा पायी प्रवास, VIDEOपाहून थक्क व्हाल!

लोकांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचा 14 हजार फुटांवर 11 तासांचा पायी प्रवास, VIDEOपाहून थक्क व्हाल!

त्यासाठी त्यांना 16 हजार फुटांचा एक डोंगरही पार करावा लागला. या खेड्यात फक्त 10 घरं असून त्यात 50 लोक राहतात.

  • Share this:

ईटानगर 18 सप्टेंबर: अरुणाचल प्रदेशचे (Arunachal Pradesh) मुख्यमंत्री पेमा खांडू (Pema Khandu) यांनी नुकताच आपल्या मतदार संघाचा दौरा केला. त्यांचा हा दौरा सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. नेत्याने आपला मतदारसंघातल्या लोकांना भेटणं हे काही तसं नवं नाही. मात्र खांडू यांचा दौरा हा खूपच वेगळा होता. अरुणाचल प्रदेश हा दऱ्या खोऱ्या आणि पर्वतांनी संपन्न असल्याने अनेक गावे ही दुर्गम भागात आहेत. अशाच एकागावात पोहोचण्यासाठी त्यांनी दऱ्या खोऱ्या ओलांडत तब्बल 11तासांचा खडतर प्रवास केला.

खांडू यांनी तवांग या जिल्ह्याच्या शहरापासून 97 किलोमीटर दूर असलेल्या लुगुतांग या गावाला भेट देण्याचा निर्णय घेतला मात्र तिथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. अतिशय दुर्मम भागात पोहोचण्यासाठी त्यांना 24 किलोमीटर पायी जावं लागलं. दऱ्या, खोऱ्या, नदी, नाले पार करत हे 24 किमीचं अंतर पार करण्यासाठी त्यांना तब्बल 11 तासंचा अवधी लागला. एक सुरक्षा जवान आणि काही स्थानिक लोकांना सोबत घेऊन खंडू आपलं ऑफिस सोडून दौऱ्यावर निघाले.

लुगुतांग हे छोटसं गाव 14 हजार 500 फुटांवर वसलेलं गाव आहे. त्यासाठी त्यांना 16 हजार फुटांचा एक डोंगरही पार करावा लागला. या खेड्यात फक्त 10 घरं असून त्यात 50 लोक राहतात.

सरकारी योजनांची त्यांना माहिती व्हावी, आपली दखल कुणीतरी घेते हा विश्वास त्यांच्यात निर्माण व्हावा यासाठी हा दौरा केल्याचं खांडू यांनी सांगितलं. खांडू यांनी या खेड्यात दोन दिवस मुक्कामही केला. त्यांच्या या दौऱ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 19, 2020, 5:57 PM IST
Tags: tracking

ताज्या बातम्या