Home /News /national /

इम्प्रेस करायला म्हणून गर्लफ्रेंडला दिली कार; तिच्यासह बॉयफ्रेंड तुरुंगात, वडिलांवरही गुन्हा

इम्प्रेस करायला म्हणून गर्लफ्रेंडला दिली कार; तिच्यासह बॉयफ्रेंड तुरुंगात, वडिलांवरही गुन्हा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

बॉयफ्रेंडने कार चालवायला देताच गर्लफ्रेंडने असं काही केलं की त्या दोघांसह तरुणाचे वडीलही अडचणीत आले.

    रायपूर, 04 ऑगस्ट : एखाद्या तरुणी, गर्लफ्रेंडला किंवा बायकोला इम्प्रेस करण्यासाठी तरुण, पुरुष काय काय नाही करत. असाच एक बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्याच्या नादात असं काही करून केला ज्यामुळे तिच्यासह त्यालासुद्धा अटक झाली. दोघं तुरुंगात गेलेच पण तरुणाच्या वडिलांवरही गुन्हा दाखल झाला. छत्तीसगढच्या विलासपूरमधील ही धक्कादायक घटना. मुंगेलीत राहणारा रवींद्र कुर्रे आपल्या गर्लफ्रेंडसोबत कारने जात होता. त्याने आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायला म्हणून तिला कार चालवायला दिली. तिला ड्रायव्हिंग येत नव्हतं. तरी त्याने तिच्या हातात गाडीचं स्टेअरिंग दिलं. काही अंतरापर्यंत कार चालवताच जोशात तिच्या हातून भयंकर दुर्घटना घडली. हे वाचा - चालत्या कारमधून रस्त्यावरून पडली चिमुकली; मागून भराभर गाड्या आल्या आणि...; धक्कादायक VIDEO काही अंतर ड्राइव्हिंग केल्यानंतर तिला इतका जोश चढला की तिने एक्सिलेटर जास्त दाबलं आणि त्यामुळे समोरून येणाऱ्या बाईकला टक्कर बसली. तिघांना तिने चिरडलं.  दोघांचा जागच्या जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. ज्याच्या पायाचं हाड तुटलं आहे. खांदा, कंबर आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघंही आरोग्य केंद्रात उपचारासाठी जात होते. दुर्घटनेनंतर स्थानिकांनी तरुण आणि तरुणीला पकडलं. याची माहिती पोलिसांना दिली. आज तकच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी सांगितलं की, रवींद्रने आपल्या गर्लफ्रेंडला कार चालवायला दिली आणि तो स्वतः बाजूच्या सीटवर बसला होता. ड्रायव्हिंग करताना दोघं हसत होते, मजा करत होते तेव्हा उत्साहात अचानक एक्सिलेटर दाबलं गेलं आणि समोरून येणाऱ्या बाईकला टक्कर बसली. यात दोघांचा मृत्यू झाला तर काही जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास केला जात आहे. हे वाचा - VIDEO - स्कायडायव्हिंगवेळी पॅराशूटचा गुंता; तरुणाने जीव वाचवण्यासाठी शेवटपर्यंत धडपड केली अखेर... पोलिसांनी दोघांनीही अटक केली. ही कार रवींद्रच्या वडिलांच्या नावे रजिस्टर आहे. त्यामुळे कारमालक म्हणून त्याच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Accident, Chattisgarh, Couple

    पुढील बातम्या