बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं; कोरोना योद्ध्याच्या लेकीने मागितली मुख्यमंत्र्यांकडे मदत

बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं; कोरोना योद्ध्याच्या लेकीने मागितली मुख्यमंत्र्यांकडे मदत

कोरोना योद्ध्या आजही देशाप्रती कर्तव्य बजावत आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करीत आहेत. यामध्ये अनेक योद्ध्यांना जीव गमवावा लागला आहे

  • Share this:

भोपाळ, 02 जून : मध्य प्रदेशातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू पावलेल्या कोरोना योद्धाची पत्नी आणि मुलीने राज्याचे  मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मदतीची हाक दिली आहे. जहांगिराबाद पोलीस ठाण्यातील 100 नंबर वाहनाचे ड्रायव्हर योगेंद्र सिंह सोनी यांचा महिनाभरापूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपुणामुळे मृत्यू झाला. आता या कोरोना योद्ध्याच्या निष्पाप मुलांनी सीएम शिवराजसिंह चौहान यांना पत्र आणि व्हिडीओ पाठवून मदतीचा पुकारा केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून सातत्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर इलाज करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे खासगी रुग्णांलयांमध्ये गेल्या महिन्यापर्यंत पगार मिळू न शकल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सरकारी रुग्णालयांतही काही वेगळी अवस्था नव्हती. कोरोना संसर्गाच्या भीतीने सरकारी रुग्णालयातही रुग्णांवर उपचारात बेपर्वाई करण्यात आली. टीटी नगर परिसरात राहणारे योगेन्द्र सोनी यांचा 3 वर्षांचा मुलगा कृष्णा, पत्नी रेखा आणि आई विमला हे सगळे कोरोनाला हरवून घरी परतले, त्याच्या दुसऱ्या दिवशी घरातल्या कमवत्या योगेंद्र यांचा मृत्यू झाला. इतके दिवस उलटल्यानंतरही या परिवाराच्या मदतीसाठी कुणी पुढेही आले नाही. अखेर नाईलाजाने दिवंगत कोरोना योद्ध्याच्या पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मदत मागितली आहे.

पोलीस इन्स्पेक्टर होण्याची इच्छा

जहांगिराबाद पोलीस ठाण्यातील 100 वाहनाचे ड्रायव्हर असलेल्या योगेंद्रसिंह यांचा महिनाभर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. दिवंगत ड्रायव्हर योगेंद्र सोनी यांचा 3 वर्षांचा मुलगा, पत्नी आणि आई यांना कोरोनाची लागण झाली होती. ज्या दिवशी युद्ध जिंकून हे कुटुंब घरी परतलं त्याच्या दुसऱ्या दिवशी हमीदिया रुग्णालयात योगेंद्रसिंह यांचा मृत्यू झाला. आता त्यांची पत्नी रेखा सोनी यांनी शिवराज सिंह यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. त्यांची लहानगी मुलगी तनिष्का हिने मामा शिवराज सिंह यांना व्हिडीओ मेसेज पाठवला आहे. यात तिने वडिलांचे स्वप्न पूर्ण करुन पोलीस इन्स्पेक्टर होण्याची इच्छा व्यक्त केलीय.

दर्जेदार शाळेत शिक्षण मिळावं, यासाठी मदतीची याचना या लहानगीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सध्या कुठलंही उत्पन्नाचं साधन कुटुंबाकडे नाही, हेही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. योगेंद्र यांच्या पत्नीला नोकरी नाही आणि त्यांची मुलंही सध्या शिक्षण घेत आहेत. योगेंद्र यांच्या पत्नीला नोकरीची सर्वाधिक गरज असून, नोकरी मिळावी यासाठी त्यांनी सीएम शिवराजसिंह यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने अखेर सोशल मीडियाचा वापर यासाठी करण्याची वेळ या कुटुंबावर येऊन ठेपलेली आहे.

बेपर्वाईने झाला कोरोना योद्ध्याचा मृत्यू

मृत योगेन्द्र यांच्या पत्नी रेखा यांच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवशी या संपूर्ण कुटुंबाची कोरोना युद्धानंतर रुग्णालयातून घरी पाठवणी करण्यात आली, त्याच दिवशी सकाळी कोरोना योद्धा योगेंद्र आपल्या भाच्यासह कमला नेहरु रुग्णालयातून उपचार घेऊन दुचाकीवरुन घरी परतले होते. योगेंद्र यांना पोटदुखीचा विकार होता. मात्र डॉक्टरांनी योग्य रितीने उपचार केले नसल्याची पत्नीची तक्रार आहे. त्यावेळी योगेंद्र यांचा रक्तदाबही वाढला होता, मात्र विनंती करुनही त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला नाही, अशीही त्यांची तक्रार आहे. या परिवाराच्या नजरा आता सरकारी मदतीकडे लागल्या आहेत.

हे वाचा-Covid -19 युद्धात मदतीसाठी उद्धव ठाकरेंनी मानले मुकेश आणि नीता अंबानींचे आभार

First published: June 2, 2020, 8:00 AM IST

ताज्या बातम्या