मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच आणणार Flex Fuel धोरण; कुठले नियम बदलणार?

प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच आणणार Flex Fuel धोरण; कुठले नियम बदलणार?

फ्लेक्सिबल फ्यूएल व्हेइकल (FFV) प्रणाली वापरण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत.

फ्लेक्सिबल फ्यूएल व्हेइकल (FFV) प्रणाली वापरण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत.

फ्लेक्सिबल फ्यूएल व्हेइकल (FFV) प्रणाली वापरण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली, 7 जुलै: प्रदूषण  (Air Pollution) कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच फ्लेक्स पॉलिसी (Flex Policy) लागू केली जाणार आहे. पेट्रोल आणि डिझेलसारख्या जीवाश्म इंधनाने होत असलेलं प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक इंधनांवर चालणाऱ्या इंजिनाची वाहनं तयार करण्याचा आदेश सरकार वाहन उत्पादक कंपन्यांना देऊ शकतं. फ्लेक्स इंजिनचा (Flex Engine) वापर करणाऱ्या फ्लेक्सिबल फ्यूएल व्हेइकल (FFV) प्रणाली वापरण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीमध्ये (आर्थिक वर्ष 22) जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्याद्वारे इंधन मिश्रणात केलेल्या बदलांच्या अनुषंगाने वाहनांमध्ये आवश्यक इंजिन कॉन्फिगरेशन आणि इतर बदल सुचवले जातील.

फ्लेक्स इंजिनची निर्मिती व त्यांच्या वाहनांमधील वापरास प्रोत्साहन देण्यासाठीही सरकार एका प्रोत्साहनपर योजनेवर सुद्धा काम करीत आहे. मात्र पॉलिसी बनल्यानंतरच त्याबद्दलचे अधिक तपशील जाहीर केले जातील. पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांनी माध्यमांना सांगितले की जैव-इंधनाचा (Bio Fuel) वापर सुयोग्यरित्या होण्यासाठी सरकार फ्लेक्सिबल फ्युएल व्हेइकल (FFV) वापरात आणण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे.

मजुराचा मुलगा देशाचं प्रतिनिधित्व करणार, 14 वर्षांचा विश्वनाथची सेलिंग टीममध्ये

FFV ही वाहनांची एक सुधारित प्रणाली आहे जी इथेनॉल मिश्रित घटकांबरोबरच गॅसोलीन आणि डोप्ड पेट्रोल दोन्हीवर चालू शकते. सध्या ब्राझीलमध्ये (Brazil) फ्लेक्स इंजिन प्रणाली यशस्वीरित्या वापरली जात आहे. यामुळे भारतातील लोकांवर इंधन दरांचा पडणारा भार कमी होईल आणि इंधन (पेट्रोल आणि इथेनॉल) स्विच करण्याचा पर्याय मिळेल. खरं तर ब्राझीलमध्ये विकली जाणारी बहुतेक वाहने FFV आहेत.

FFV भारतासाठी अत्यंत लाभदायक असणार आहे कारण यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या इथेनॉलचं मिश्रण केलेल्या पेट्रोलचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे FFV वाहने सर्व मिश्रणे तसेच अमिश्रित इंधनावर सुद्धा धावू शकतील. FFV ची सुरवात करण्यासाठी व्हेइकल स्टँडर्ड, टेक्नॉलॉजीज आणि रेट्रोफिटिंग कॉन्फिगरेशनचा अवलंब करणं आवश्यक आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय या स्टँडर्डची पडताळणी करेल.

भयंकर! Smartwatch मध्ये अचानक स्फोट; 4 वर्षांच्या चिमुकलीचं मनगट जळालं

वाहन कंपन्यांसाठी FFV आव्हानात्मक असेल कारण अगोदरच कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्यासाठी वेगाने काम करत आहेत. FFV च्या अंमलबजावणीनंतर कंपन्यांसाठी प्रॉडक्शन लाइन आणि टेक्नोलॉजीचा खर्च वाढेल. अगोदरच 10 टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल आणि BS-VI चा वापर सुरू झाल्यामुळे वाहन निर्मितीच्या खर्चामध्ये भर पडली आहे. बाजारात येत असलेली इलेक्ट्रिक वाहनांची स्पर्धा आणि आता FFV इंजिनं तयार करणं असं दुहेरी आव्हान ऑटोमोबाईल कंपन्यांसमोर आता उभं राहणार आहे.

First published:

Tags: Air pollution, Pollution, Vehicles